Advertisement

मी बर्‍याच वर्षांपासून तिला या त्रासातून जाताना बघत आहे : रोहित वर्मा

लोकप्रिय अभिनेत्री निशा रावनं नवरा करण मेहराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तिनं नवऱ्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे.

मी बर्‍याच वर्षांपासून तिला या त्रासातून जाताना बघत आहे : रोहित वर्मा
SHARES

लोकप्रिय अभिनेत्री निशा राव(Nisha Rav)नं नवरा करण मेहरा (Karan Mehra) विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तिनं नवऱ्यावर घरगुती हिंसाचारा(Domestic Violence)चा आरोप केला आहे. याप्रकरणी गोरेगाव (Goregaon) पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी त्याला अटक केली.

करणनं निशाचा शारिरीक आणि मानसिक छळ केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी काही कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यात करणनं रागाच्या भरात भिंतीवर ढकलून दिलं. त्यातच तिच्या डोक्याला दुखापत झाली. ही सर्व माहिती निशानं वृत्तसंस्थांना दिली.

माध्यमांना संबोधित करतांना ती म्हणाली की, करणचं दुसर्‍या अभिनेत्रीसोबत काही महिन्यांपासून अफेयर होतं आणि आम्ही घटस्फोटाची योजनाह आखत होतो.

निशाचा मित्र आणि डिझायनर रोहित वर्मा यांनी या परिस्थितीविषयी सांगितलं की "ती बर्‍याच वर्षांपासून शांतपणे दु:ख भोगत आहे. शेवटी तिने मदतीसाठी आक्रोश केला आणि स्वत: साठी आणि मुलासाठी उभं राहण्याचं ठरवलं.

असंही म्हटलं जात आहे की, रोहितनं जखमी झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

काही दिवसांपूर्वीच करण मेहराला कोरोनाची लागण झाली होती. याविषयी बोलताना तो म्हणाला होता की, 'माझ्या आणि निशात सर्वकाही आलबेल आहे. मी नुकताच पंजाबमध्ये शूटिंग करत होतो. माझ्या सेटवर काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. मी चाचणी केली जी निगेटिव्ह आली. पण मुंबईत परतल्यानंतर मी पुन्हा चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली. आता मी घरात क्वारंटाईन झालोय. आमच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याच्या बातम्या कुठून येत आहेत माहित नाही. मात्र हे सर्व खोटं आहे. माझी पत्नी निशा माझी काळजी घेतेय.

अभिनेता करण मेहराची पत्नी निशा रावल हीदेखील एक अभिनेत्री आहे. या दोघांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक चार वर्षांचा मुलगा असून काविश असं त्याचं नाव आहे.



हेही वाचा

सलमान खानच्या नोटीसनंतर KRKनं ट्विटर अकाऊंट केलं प्रायव्हेट

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा