Advertisement

‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक

अभिनेता करण मेहराला मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे.

‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक
SHARES

टीव्हीवरील गाजलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलता है’ (ye Rishta Kya kehlata Hay) या मालिकेत नैतिक ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहरा (Karan Mehra)ला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोमवारी रात्री अटक केली आहे.

करणची पत्नी अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal)नं करणसोबत झालेल्या वादानंतर गोरेगाव पोलिस (Goregaon Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण मेहराविरोधात त्याची पत्नी निशा रावलने घरगुती हिंसाचाराची (Domestic violence) तक्रार दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपासून करण आणि नेहा यांच्या वैवाहिक आयुष्यात (Marriage life) वितुष्ठ निर्माण झाल्याच्या बातम्या चर्चेत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दोघांत कडाक्याचं भांडण झालं आणि हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. त्यानंतर नेहा रावलनं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी करण मेहराला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं. काही तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच करण मेहराला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली होती. याविषयी बोलताना तो म्हणाला होता की, 'माझ्या आणि निशात सर्वकाही आलबेल आहे. मी नुकताच पंजाबमध्ये शूटिंग करत होतो. माझ्या सेटवर काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. मी चाचणी केली जी निगेटिव्ह आली. पण मुंबईत परतल्यानंतर मी पुन्हा चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली. आता मी घरात क्वारंटाईन झालोय. आमच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याच्या बातम्या कुठून येत आहेत माहित नाही. मात्र हे सर्व खोटं आहे. माझी पत्नी निशा माझी काळजी घेतेय.

अभिनेता करण मेहराची पत्नी निशा रावल हीदेखील एक अभिनेत्री आहे. या दोघांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक चार वर्षांचा मुलगा असून काविश असं त्याचं नाव आहे.हेही वाचा

मीरा चोप्रा या अभिनेत्रीची होणार चौकशी, पालिकेचे खोटे ओळखपत्र देऊन घेतली होती लस

बच्चा कंपनी स्माईल! आता चुलबुल पांडे अॅनिमेटेड अवतारात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा