Advertisement

मीरा चोप्रा या अभिनेत्रीची होणार चौकशी, पालिकेचे खोटे ओळखपत्र देऊन घेतली होती लस

मीरा चोप्रा या अभिनेत्रीला सुपरवायजरचे ओळखपत्र देऊन पालिकेच्या केंद्रात लस देण्यात आली आहे.

मीरा चोप्रा या अभिनेत्रीची होणार चौकशी, पालिकेचे खोटे ओळखपत्र देऊन घेतली होती लस
(Image: Meera Chopra/Twitter)
SHARES

मीरा चोप्रा या अभिनेत्रीला सुपरवायजरचे ओळखपत्र देऊन पालिकेच्या केंद्रात लस देण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझा इथं असलेल्या रुग्णालयात ही लस देण्यात आली.

या अभिनेत्रीची कोविड सेंटरची फ्रंट लाईन वर्कर म्हणून खोटे ओळखपत्र बनवण्यात आलं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या सेलिब्रिटीला ही लस कोणी दिली आणि कशी दिली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता चौकशीचे आदेश दिले आहेत.


या वृत्तांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चोप्रा यांनी एक निवेदन जारी केले की, तिला फक्त आपले आधार कार्ड पाठविण्यास सांगण्यात आले. ती पुढे म्हणाली की सोशल मीडियावर जो आयडी फिरत आहे तो तिचा नाही. ट्विटरवर येईपर्यंत तिला त्याबद्दल माहिती नव्हती. १९२० लंडनमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीनं असंही म्हटलं आहे की, तिनं या कृत्याचा निषेध केला आहे आणि ‘कसे आणि का’ हेही जाणून घेण्याची तिची इच्छा आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांना लसीपासून मुकावं लागत असताना मीरा चोप्रा या सेलिब्रिटीला थेट लस कशी देण्यात आली? असा सवाल आता विरोधक विचारत आहेत. तसंच चुकीच्या पध्दतीनं ओळखपत्र बनवून देणाऱ्या संबंधित एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपनं केली आहे.

दरम्यान नियमबाह्य लस घेतल्यानंतर मीरा चोप्रा यांनी लस घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसंच या फोटो बरोबर बनवण्यात आलेले खोटे ओळखपत्र देखील पोस्ट करण्यात आले. तसंच नियमबाह्य लस देण्यात येणाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती.


आमदार निरंजन डावखरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ठाणे महापालिकेनं कोविड हॉस्पिटलमध्ये कर्मचारी पुरवण्याचं कंत्राट दिलेल्या ओम साई आरोग्यकेअर कंपनीनं चक्क तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री मीरा चोप्राला कामावर ठेवलंय. मीराला सुपरवायझर म्हणून काम करण्याचे कंत्राटदार किती पैसे देतोय? की लस घेण्यापूरते आयकार्ड दिले गेले? असा सवाल त्यांनी केला आहे.



हेही वाचा

बच्चा कंपनी स्माईल! आता चुलबुल पांडे अॅनिमेटेड अवतारात

विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंह’ ऑगस्टमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा