Advertisement

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटिव्ह


टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

कोरोनाव्हायरसमुळे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स संक्रमित होत आहेत. त्यात टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिचं नाव देखील समाविष्ट्य झालं आहे. श्वेताने तिला कोरोना झाल्याचं स्वत: कबुल केलं आहे. 

ती म्हणाले की, माझी चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत: ला घरी क्वारंटाईन केलं आहे. हा काळ कठीण आहे. पण सावधगिरी बाळगणं शहाणपणाचं आहे.

श्वेता म्हणाली, तिला स्वत: मध्ये कोरोनाची लक्षण दिसली. १६ सप्टेंबरपासून तिची तब्येत बिघडताना दिसली होती. त्यानंतर शूटिंग सोडली आणि लगेचच कोरोना टेस्ट करुन घेतली. ती म्हणाली की, मी कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करू शकत नाही. मी लोकांच्या आसपास होतो आणि बरेच लोक माझ्या आजूबाजूला होते. माझ्यामुळे इतरांना धोका निर्माण होऊ नये म्हणून मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार श्वेता १ ऑक्टोबरपर्यंत स्वत:ला क्वारंटाईन करू शकते. यावेळी ती गरम पाण्याचे भरपूर सेवन करीत आहे. आणि तिला बरं वाटतंय.

श्वेतानं तिची दोन्ही मुलं पहिल्या पतीकडे म्हणजेच राजा चौधरीच्या घरी पाठवली आहेत. जेणेकरून ते सुरक्षित राहतील.

श्वेता बिग बॉस सीझन ४ ची विजेती राहिली आहे आणि एकता कपूरच्या शो 'कसौटी जिंदगी की' मध्ये प्रेरणाची भूमिका साकारली आहे. सध्या ती मेरे डॅड की दुल्हन या मालिकेत काम करत आहे. हेही वाचा

चौकशीदरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याच्या रणवीरच्या विनंतीवर NCB चा खुलासा

बलमवा बंबई गईल हमार!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement