Advertisement

अभिनेता आशिष रॉय यांचं मुंबईत निधन, उपचारासाठीही नव्हते पैसे

‘ससुराल सिमर का' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' सारख्या मालिकांमध्ये झळकलेले अभिनेते आशिष रॉय यांचं निधन झालं आहे.

अभिनेता आशिष रॉय यांचं मुंबईत निधन, उपचारासाठीही नव्हते पैसे
SHARES

‘ससुराल सिमर का' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' सारख्या मालिकांमध्ये झळकलेले अभिनेते आशिष रॉय यांचं निधन झालं आहे. ते 55 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंड निकामी झाल्यानं ते सतत आजारी होते. मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांनी जोगेश्वरी येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अ

गेल्या काही वर्षांपासून आशिष यांना किडनीचा आजार होता. ते स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या प्रयत्न करत होते, यात त्यांना काही प्रमाणात यशदेखील आले होते. कलर्स वाहिनीशी एका मालिकेसंदर्भात त्यांची बोलणीदेखील सुरू होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक डबिंगही केलं होतं. अचानक आज सकाळी 3.30 च्या सुमारास त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं. जो मुलगा त्यांच्या मदतीसाठी त्यांच्याजवळ होता, त्याला त्यांनी आपल्या त्रासाविषयी सांगितलं होतं. मुलाशी बोलत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.'

अखेरच्या काळात त्यांच्याकडे उपचारांसाठीही पैसे नव्हते. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहून त्यांनी अशा प्रकारे जीवन जगणं खूप कठीण आहे, अशी खंत व्यक्त केली होती. त्यांनी अभिनेता सलमान खानकडे मदतीसाठी याचना केली होती.

२०१९ च्या सुरुवातीच्या महिन्यात आशिष यांना अर्धांगवायू झाला होता. त्यावेळी आशिष म्हणाले होते की, "मी अर्धांगवायूच्या झटक्यानंतर बरा झालो, पण मला काम मिळाले नाही. मी सध्या माझ्या बचतीवर आयुष्य जगतोय पण तेही संपुष्टात येणार आहे. मला कोलकातामध्ये माझ्या बहिणीकडे शिफ्ट केलं जाईल, पण इंडस्ट्रीमधील एखाद्यानं मला काम द्यावं, अन्यथा काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे.'हेही वाचा

भारतीय वेब सीरिज 'दिल्ली क्राइम'नं पटकावला एमी अवॉर्ड

कंगनाला हायकोर्टाकडून दिलासा, ८ जानेवारीपर्यंत अटक टळली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement