Advertisement

…आणि २० वर्षांनी रंगभूमीवर परतले विजय पाटकर

'दहा बाय दहा' या विनोदी नाटकाद्वारे पाटकर रंगभूमीवर परतत आहेत. पाटकरांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेनं सजलेलं हे नाटक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ६ एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

…आणि २० वर्षांनी रंगभूमीवर परतले विजय पाटकर
SHARES

एके काळी रबर मॅन अशी ओळख असणाऱ्या अभिनेते विजय पाटकर यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांवर वर्चस्व गाजावलं आहे. जाहिरातींसोबतच सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्येही आपला ठसा उमटवणारे पाटकर एका मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा रंगभूमीकडे वळले आहेत.


सिनेमांमध्ये व्यग्र

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’मध्ये साकारलेल्या पोलिस अधिकाऱ्यानंतर पाटकर थेट रंगभूमीवर एक मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. रंगभूमीवरूनच उदयास आलेले पाटकर मध्यंतरीच्या काळात सिनेमांमध्ये अतिशय व्यग्र होते. त्यामुळं त्यांना नाटकांसाठी वेळ देणं शक्य होत नव्हतं, पण रंगभूमीवर काम केलेला कोणताही नट फार नाटकांपासून दूर राहू शकत नाही हे पाटकरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तब्बल २० वर्षांनी पाटकर मराठी रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत.


दहा बाय दहा

'दहा बाय दहा' या विनोदी नाटकाद्वारे पाटकर रंगभूमीवर परतत आहेत. पाटकरांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेनं सजलेलं हे नाटक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ६ एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार आहे. अनिकेत पाटील दिग्दर्शित 'दहा बाय दहा' या विनोदी नाटकात पाटकरांबरोबर प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे हे मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. यासोबतच विदिशा म्हसकर हा नवा चेहरादेखील या चौकडीत दिसणार आहे.  


विनोदी ढंगात

स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित या नाटकाचा संपूर्ण महाराष्ट्रात दौरा होणार आहे. याचं लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केलं आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट घेऊन येत असलेलं हे नाटक, सामान्य माणसांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्यास प्रेरित करेल असं सांगण्यात येत आहे. 'दहा बाय दहा' च्या घरात हसत खेळत जगणाऱ्या या कुटुंबाला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावं लागतं, त्यानंतर त्यांच्यासोबत काय होतं? त्यातून ते कसा गोंधळ घालतात? हे सारं काही अगदी विनोदी ढंगात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.



हेही वाचा- 

सयाजी-किशोरच्या ‘बाबो’चा फर्स्ट लुक पाहिला का?

मोठ्या पडद्याकडं वळली साईंकितची पावलं




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा