Advertisement

नाट्यगृह भाडेदरात ७५ टक्के कपात, नाट्यव्यावसायिकांना मोठा दिलासा

मुंबई महापालिकेने नाट्यगृहांच्या भाडेदरांत ७५ टक्क्यांची कपात करून कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या नाट्यव्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे.

नाट्यगृह भाडेदरात ७५ टक्के कपात, नाट्यव्यावसायिकांना मोठा दिलासा
SHARES

मुंबई महापालिकेने नाट्यगृहांच्या भाडेदरांत ७५ टक्क्यांची कपात करून कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या नाट्यव्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरूवारी यांसदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा केली. 

कोरोनाचं संकट (coronavirus) आणि लाॅकडाऊनमुळे नाट्यगृह आणि सिनेमागृह तब्बल ७ ते ८ महिने सक्तीने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर अनलाॅक प्रक्रियेंतर्गत नोव्हेंबर महिन्यात नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. ती देखील एकूण प्रेक्षक क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थितीसह. प्रयोगांना सुरूवात होऊन देखील प्रेक्षक नाट्यगृहात जाण्यास घाबरत आहेत.

या काळात नाट्यव्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. कोविड काळात झालेलं आर्थिक नुकसान आणि सद्यस्थितीत प्रेक्षकांची रोडावलेली संख्या यामुळे नाट्य निर्मात्यांना नाटकाचे प्रयोग करणं अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळे नाट्यगृहांचं भाडं कमी करण्याची मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने महापौरांकडे केली होती. 

हेही वाचा- अभिनेते प्रशांत दामले कोरोना पॉझिटिव्ह

या विनंतीनुसार परिस्थितीचा आढावा घेऊन महापालिकेने (bmc) नाट्यगृहांच्या भाड्यात ७५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठी नाटक वा वाद्यवृंदासाठी प्रत्येक खेळासाठी ४०० रुपये तिकीट दरापर्यंत ५ हजार रुपये भाडं, तर अमराठी नाटक किंवा वाद्यवृंदास एका कार्यक्रमास १० हजार रुपये (जीएसटी वगळून) भरावे लागतील.

प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली नाट्य मंदिरातील लघु नाट्यगृहासाठी १५० रुपये तिकीटदरापर्यंत ३ हजार रुपये अधिक जीएसटी आणि अमराठीसाठी ६ हजार रुपये अधिक जीएसटी, असे भाडं आकारले जाईल. हे भाडं ३१ मार्च २०२१ पर्यंत अथवा ५० टक्के आसन क्षमतेबाबतचा निर्णय रद्द होईपर्यंत आकारण्यात येईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी दिली. 

भाड्यात सवलत देताना महापालिकेने बालनाट्यांच्या प्रयोगावर बंदी आणली आहे. तसंच आसन क्षमतेच्या निम्म्या प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी व मास्क वापरणंही बंधनकारक असेल. कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन होत आहे किंवा नाही, याची चाचपणी करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांचीही तैनाती करणार आहे.

बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे, विलेपार्ले - दिनानाथ मंगेशकर आणि मुलूंड येथे महाकवी कालीदास अशी महापालिकेची मुंबईत ३ नाट्यगृह आहेत.

(bmc cuts 75 percent rate for marathi theatre shows says mayor kishori pednekar)

हेही वाचा- उर्मिला मातोंडकर यांच इन्टाग्राम अकाऊन्ट हॅक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा