कुरारमध्ये नाट्यरसिकांना मिळाली दशावताराची मेजवानी


  • कुरारमध्ये नाट्यरसिकांना मिळाली दशावताराची मेजवानी
SHARE

दिंडोशी - सत्तेच्या स्वार्थासाठी कुणी कितीही डावपेच खेळलं, तरी दैवयोग कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, याचा प्रत्यय नुकत्याच सादर झालेल्या दिंडोशी कुरार गावामधील आनंदवाडीत आला. निमित्त होतं कोकण (मालवणी) एकता मंडळानं आयोजित केलेल्या दैवयोग दशावतारी नाट्यप्रयोगाचं. सावरीश्वर दशावतार नाट्यमंडळानं हा प्रयोग सादर केला. हे नाटक म्हणजे रसिकांसाठी एक सांस्कृतिक मेजवानीच ठरली.

या वेळी आमदार सुनील प्रभू, तेजाब चित्रपटाचे दिग्दर्शक एन. चंद्रा, आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, उपविभागप्रमुख विष्णू सावंत, महिला उपविभाग संघटक पूजा चौहान, शाखाप्रमुख कृष्णा देसाई, प्रभाकर राणे, मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, सेक्रेटरी संदीप वाककर, प्रकाश परब, भाई सावंत, नाट्य़मंडळाचे प्रकाश आकेरकर, राऊळ महाराज, प्रकाश बनगे आदी उपस्थित होते. या नाट्यप्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या