परळमध्ये एकवटले 'लोकरंग'!


  • परळमध्ये एकवटले 'लोकरंग'!
  • परळमध्ये एकवटले 'लोकरंग'!
  • परळमध्ये एकवटले 'लोकरंग'!
SHARE

सोशल मीडियात अडकून लोकसंस्कृती आणि परंपरा विसरत चाललेल्या नव्या पिढीने गुरुवारी परळमध्ये महाराष्ट्रातल्या मातीतले 'लोकरंग' अनुभवले. 'महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान, न्यास'तर्फे परळच्या दामोदर सभागृहात 'लोकरंग महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होतेे. या कार्यक्रमाला सर्व वयोगटातील रसिकप्रेक्षकांनी मोठी गर्दी केली.रसिकप्रेक्षकांनी या कार्यक्रमात पोवाडा, भारुड, गोंधळ व लोकसंगीताला मिळालेली पारंपरिक नृत्याची जोड पाहून प्रेक्षक भारावून गेले.दामोदर सभागृहातील या कार्यक्रमाला 500 हून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावत लोकसंस्कृतीचा गाभा समजून घेतला. 'मुंबई लाइव्ह' या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. गेल्या 17 वर्षांपासून 'महाराष्ट्र सांस्कृतिक अभियाना, न्यास'तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. लोकसंगीतातून भारतदर्शन, अरण्यपर्व, परंपरा या नवनवीन संकल्पनाही राबवण्यात येत आहेत.


संतोष परब यांच्या लेखणीतून 'माझा महाराष्ट्र' ही संकल्पना साकारली आहे. तर संतोष आंब्रे यांनी या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे देखील वाचा -

लोकसंगीताची मजा अनुभवायचीय?, 'लोकरंग महोत्सवा'ला या!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या