Advertisement

मुंबईत नाटक महोत्सवाचं आयोजन


मुंबईत नाटक महोत्सवाचं आयोजन
SHARES
Advertisement

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्तीच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली कलाकृती आहे. पण या इंटरनेट आणि मोबाईलच्या विश्वात ही कलाकृती लोप पावत चाललीय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. पण या परिस्थितीत नाट्यमहोत्सव नाटकांचा हाच प्रवास जिवंत ठेवत आहे. असाच एक नाटक महोत्सव 'नाटक कंपनी' तर्फे मुंबईत देखील आयोजित करण्यात आला आहेपुण्यातल्या काही तरूणांनी एकत्र येत दहा वर्षांपूर्वी नाटक कंपनी सुरू केली. पाहता पाहता नाटक कंपनीनं १० वर्ष पूर्ण केली. या दहा वर्षात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, पंजाबी भाषेतील आणि काही गैर भाषिक नाटकं सादर करण्यात आली. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत नाटक संस्कृती पोहोचवणं हा या नाटक कंपनीचा मूळ उद्देश आहे. गेली अनेक वर्ष नाटक कंपनीनं वेगवेगळ्या धाटणीची नाटकं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. नाटक कंपनीनं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.  

नाटक कंपनीला आता १० वर्ष पूर्ण झाली आहेत. १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईत आणि पुण्यात नाटक कंपनी फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १ आणि २ जून असे दोन दिवस हा महोत्सव रंगणार आहे. तर पुण्यात ८, ९ आणि १० जून असे तिन दिवस हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं नाटकात काम करणारे कलाकार एकत्र येत विविध विषयांवर आधारित नाटकं सादर करणार आहेनाटक कंपनी फेस्टिव्हलच्या आयोजनामागे फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे आनंद साजरा करणं. आत्तापर्यंत आम्ही २५ नाटकं सादर केली आहेत. त्यापैकी आमच्या १० नाटकांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. नाटक महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार मानायचे हा निर्णय घेतला. या मुंबईनं आणि इथल्या प्रेक्षकांनी आम्हाला खूप काही दिलं आहेत्यामुळे मुंबईशी आमचं वेगळं नातं आहे. या कारणास्तव आम्ही मुंबईत देखील नाटक महोत्सव आयोजित केला.

- सिद्धार्थ मेनन, सदस्यनाटक कंपनी

नाटक कंपनी महोत्सवाला अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. मिथिला पालकर, सई ताम्हणकर हे कलाकार नक्कीच महोत्सवाची शोभा वाढवतीलजर तुम्हाला देखील या महोत्सवात सहभागी व्हायचं असेल तर ticketeez.comइथं तिकिट बुक करणं आवश्यक आहेहेही वाचा

आता स्पृहा म्हणणार नाही, 'डोन्ट वरी बी हॅपी'!


संबंधित विषय
Advertisement