Coronavirus cases in Maharashtra: 1082Mumbai: 642Pune: 130Navi Mumbai: 28Islampur Sangli: 26Kalyan-Dombivali: 25Ahmednagar: 25Thane: 24Nagpur: 19Pimpri Chinchwad: 17Aurangabad: 13Vasai-Virar: 10Latur: 8Buldhana: 7Satara: 6Panvel: 6Pune Gramin: 4Usmanabad: 4Yavatmal: 3Ratnagiri: 3Palghar: 3Mira Road-Bhaynder: 3Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Ulhasnagar: 1Gondia: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 64Total Discharged: 79BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

मराठी रंगभूमीवर 'हिमालयाची सावली'

मराठी रंगभूमीवर गाजलेली बरीच नाटकं नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यापैकी 'हिमालयाची सावली' हे नाटकही मराठी रसिकांच्या भेटीला येणार असल्याची एक्सक्लुझीव्ह बातमी काही दिवसांपूर्वीच 'मुंबई लाइव्ह'नं दिली होती.

मराठी रंगभूमीवर 'हिमालयाची सावली'
SHARE

मराठी रंगभूमीवर गाजलेली बरीच नाटकं नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यापैकी 'हिमालयाची सावली' हे नाटकही मराठी रसिकांच्या भेटीला येणार असल्याची एक्सक्लुझीव्ह बातमी काही दिवसांपूर्वीच 'मुंबई लाइव्ह'नं दिली होती. आता हे नाटक प्रत्यक्ष आकाराला येत आहे.

नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी

जुने ते सोने या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या आणि डॉ. श्रीराम लागू, शांता जोग, अशोक सराफ या कलाकारांच्या उत्तम अभिनयाच्या अदाकारीनं सजलेल्या 'हिमालयाची सावली' या अभिजात नाट्यकलाकृतीचा आस्वाद नाट्यरसिकांना लवकरच घेता येणार आहे. आजवर अनेक सकस नाट्यकलाकृती प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

४० वर्षांनी रंगभूमीवर

प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स निर्मित व सुप्रिया प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई आहेत. तब्बल ४० वर्षांनी रंगभूमीवर येणारं हे नाटक सर्व रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस निर्माता व दिग्दर्शकांचा आहे. प्रा. वसंत कानेटकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. रविवार २९ सप्टेंबरला नाशिक येथील कालिदास नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. 

व्रतस्थ समाज

एका व्रतस्थ समाज कार्यकर्त्याच्या पत्नीला कशाप्रकारे अवघं आयुष्य जगावं लागतं अशा आशयाच्या या नाटकात शरद पोंक्षे हे श्रीराम लागू यांनी केलेली नानासाहेबांची भूमिका साकारणार असून, त्यांच्यासोबत शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, मीनल बाळ, कृष्णा राजशेखर आदि कलाकार आहेत. संगीताची जबाबदारी राहुल रानडे, तर कलादिग्दर्शन संदेश बेंद्रे यांचे असणार आहे. वेशभूषा मंगला केंकरे यांची आहे. निर्मिती सूत्रधार सुभाष रेडेकर आहेत. अंजली व अंशुमन कानेटकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.हेही वाचा -

हिमेश बनला हॅप्पी आणि हार्डी

या शोमध्ये घडली भरत-अंकुश भेटसंबंधित विषय
संबंधित बातम्या