Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

या शोमध्ये घडली भरत-अंकुश भेट

भरत-अंकुश हे मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार बऱ्याच दिवसांनी एकत्र आले. अंकुषसारख्या आपल्या जीवलग मित्राला भेटताना हळव्या मनाच्या भरतच्या डोळ्यात अश्रू तरळले.

या शोमध्ये घडली भरत-अंकुश भेट
SHARES

भरत-अंकुश हे मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार बऱ्याच दिवसांनी एकत्र आले. अंकुशसारख्या आपल्या जीवलग मित्राला भेटताना हळव्या मनाच्या भरतच्या डोळ्यात अश्रू तरळले.


एक टप्पा आऊट

छोट्या पडद्यावरील स्टँड अप कॅामेडी शोमध्ये आणखी एका नव्या शोची भर पडली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेल्या 'एक टप्पा आऊट' या नव्या स्टँड अप कॅामेडी शोकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या शोच्या १२ जुलैच्या एपिसोडमध्ये सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात जजची धुरा सांभाळणाऱ्या भरत जाधवला खास सरप्राईज देण्यासाठी अंकुशनं या मंचावर हजेरी लावली आहे. आपल्या शोमध्ये अंकुशला पाहून भरत भारावून गेला. 


लालबाग-परळमध्ये बालपण

अंकुश आणि भरतची मैत्री खूप जुनी आहे. लालबाग-परळमध्ये या दोघांचंही बालपण गेलं. गल्लीबोळातल्या छोट्या मोठ्या एकांकिकांपासून ते अगदी सिनेमापर्यंतचा प्रवास दोघांनी एकत्रच केला. दोघांमधली मैत्री अधिक घट्ट होत गेली. या प्रवासात अनेक चांगल्या वाईट आठवणी आहेत. 'एक टप्पा आऊट'च्या मंचावर अंकुश आला आणि या आठवणींना उजाळा मिळाला. आठवणीतले किस्से सांगताना भरतलाही अश्रू आवरले नाहीत. दोस्त असावा तर असा... अंकुशच्या हजेरीनं सेटवर जल्लोषाचं वातावरण होतं.


मैत्रीचे किस्से

भरतचं 'मोरुची मावशी' हे नाटक सध्या तूफान गाजत आहे. अंकुशनं फर्माईश केल्यानंतर भरतनं या नाटकातल्या सुप्रसिद्ध 'टांग टिंग टिंगा...' या गाण्यावर ताल धरुन नृत्य केल्यानं या एपिसोडची रंगत आणखी वाढली. भरतच्या या परफॅार्मंसला अंकुशनं शिट्टी वाजवून दाद दिली. 'एक टप्पा आऊट'च्या स्पर्धकांसाठी हा अविस्मरणीय अनुभव ठरला. इतकंच नव्हे तर अंकुश आणि भरत यांच्यासाठीही हे क्षण खूप मोलाचे ठरले आहेत. भरत-अंकुशच्या मैत्रीचे किस्से जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही हा एपिसोड मिस करणार नाहीत असा विश्वास स्टार प्रवाहचे सतिश राजवाडे यांनी व्यक्त केला आहे.हेही वाचा-

'स्वराज्य जननी जिजामाता'च्या रूपात अमृता पवार

कशासाठी, तर चाहत्यांच्या प्रेमासाठी - तेजश्री प्रधान
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा