Advertisement

सर्वोत्कृष्ट सात एकांकिकांचा 'प्रयोगोत्सव'!

वर्षभरात गाजलेल्या सर्वोत्कृष्ट एकांकिका एकाच व्यासपीठावर पाहता याव्यात, याकरता इलेव्हन अवर्स प्रोडक्शनने 'प्रयोगत्सवा'चे आयोजन केले होते. प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात प्रयोगोत्सव संपन्न झाला, यावेळी एकूण ७ सर्वोत्कृष्ट एकांकिकांचे सादरीकरण झाले.

सर्वोत्कृष्ट सात एकांकिकांचा 'प्रयोगोत्सव'!
SHARES

नाट्यरसिकांचे एकांकिकांवरचे वाढते प्रेम लक्षात घेता विविध स्तरावर एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जाते. वर्षभरात गाजलेल्या सर्वोत्कृष्ट एकांकिका एकाच व्यासपीठावर पाहता याव्यात, याकरता इलेव्हन अवर्स प्रोडक्शनने 'प्रयोगत्सवा'चे आयोजन केले होते. प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात प्रयोगोत्सव संपन्न झाला, यावेळी एकूण ७ सर्वोत्कृष्ट एकांकिकांचे सादरीकरण झाले.


 

प्रयोगोत्सवाचे हे यंदाचे दुसरे वर्ष होते. वर्षभरात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सात एकांकिका यावेळी दाखवण्यात आल्या. महर्षी दयानंद महाविद्यालयाची ‘शुभयात्रा’, नाट्यवाडा प्रस्तुत ‘मॅट्रिक’, ‘माणसं’, ‘पॉज’, सिडनेहॅम महाविद्यालयाची ‘निर्वासित’, पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची ‘सॉरी परांजपे’ आणि रॉ प्रोडक्शनची ‘डॉल्बी वाजलं की धडधड’ आदी दर्जेदार एकांकिका यावेळी सादर करण्यात आल्या.



अशोक पालेकर, जयराज नायर, अरुण काकडे, विद्याताई पटवर्धन, सविता मालपेकर, शरद सावंत आणि शीतल शुक्ल आदी दिग्गज रंगकर्मींना यावळी गौरवण्यात आले. प्रत्येक एकांकिकेलाही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या सन्मानचिन्हाचीही एक वेगळी खासियत आहे. प्रत्येक एकांकिकेचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या आधारे सन्मानचिन्ह तयार करण्यात आली आहेत.



एकांकिकांमधून कामं करून चित्रपट, मालिका आणि नाट्यक्षेत्रात आपलं करिअर घडवणारे अनेक कलाकारही यावेळी उपस्थित होते.



हेही वाचा

जागतिक रंगभूमी दिन: 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नावाचं 'सौंदर्यशास्त्र'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा