Advertisement

'दहा बाय दहा'नं दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश

काही नाटकं संहितेच्या माध्यमातून विविध संदेश रसिकांपर्यंत पोहोचवत असतात, पण काही मात्र या पालिकडं जाऊनही एक वेगळा मेसेज पोहोचवण्याचं काम करतात. 'दहा बाय दहा' या नाटकानंही ५० व्या प्रयोगाचं औचित्य साधत एक संदेश दिला आहे.

'दहा बाय दहा'नं दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश
SHARES

काही नाटकं संहितेच्या माध्यमातून विविध संदेश रसिकांपर्यंत पोहोचवत असतात, पण काही मात्र या पालिकडं जाऊनही एक वेगळा मेसेज पोहोचवण्याचं काम करतात. 'दहा बाय दहा' या नाटकानंही ५० व्या प्रयोगाचं औचित्य साधत एक संदेश दिला आहे.

एक अनोखी चौकट मोडत स्वतःला अभिमान वाटेल असं निसर्गसंवर्धनाचं कार्य 'दहा बाय दहा' नाटकाच्या संपूर्ण टीमनं डोंबिवली येथे नुकत्याच पार पडलेल्या सुवर्ण महोत्सवानिमित्तानं केलं. आरेमध्ये झालेल्या वृक्षतोडीविरोधात सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. रात्रीच्या पोटात हजारो झाडांची कत्तलं होत असताना, त्याच्या निषेधार्थ 'दहा बाय दहा' च्या टीमनंही आवाज उचलत, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या आवारात ५० व्या यशस्वी प्रयोगानंतर रात्री वृक्षारोपण केलं. 'आम्हाला विकास हवा आहे, भकास नको', असा संदेश 'दहा बाय दहा'च्या टीमनं यावेळी दिला.

मध्यमवर्गीय कुटुंबाला आपलंसं करणारं आणि 'दहा बाय दहा' चौकटीबाहेर विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या धम्माल विनोदी नाटकातील संपूर्ण टीमनं सुवर्ण महोत्सवी प्रयोगानिमित्त समाजासाठी आणि पर्यावरणासाठी महत्वपूर्ण घटक असलेल्या निसर्गसंवर्धनाकडं रसिकांचं लक्ष वेधलं. मध्यमवर्गीय मानसिकता आणि विचारांना छेद देऊन चौकटीबाहेर येण्याचा संदेश देणारं 'दहा बाय दहा' हे विनोदी नाटक आणि त्यातील सर्व कलाकार प्रेक्षकांना चांगलंच पसंतीस उतरत आहे. स्वरूप रिक्रीएशन अँड मीडिया प्रायवेट लि. निर्मित हे नाटक अनिकेत पाटील यांनी दिग्दर्शित केलं असून, विजय पाटकरांसोबत प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे आणि विदीशा म्हसकर यांचा धुडगूसदेखील पहायला मिळतो. या नाटकाचं लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केलं आहे.



हेही वाचा -

या मास्क मॅनचं रहस्य काय?

…आणि दगडी चाळीत अवतरले डॅडी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा