१० हायब्रिड बस आगारात धुळखात पडून


१० हायब्रिड बस आगारात धुळखात पडून
SHARES

अत्याधुनिक सुविधा पुरवून देणाऱ्या इलेक्ट्रिकल हायब्रिड बसची वाट मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून पाहात आहेत. पण मुंबईकरांना आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण एमएमआरडीए आणि बेस्ट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने मुंबईत दाखल झालेल्या या १० बसेस सध्या बस आगारात धुळखात पडून आहेत.


बसेस विनावापर पडून

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने १.६१ कोटी रुपये खर्चून १० इलेक्ट्रिकल हायब्रिड बसची खरेदी केली होती. पण एमएमआरडीए आणि बेस्ट हे दोघेही या बसची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे या बसेस सध्या आणिक, कुर्ला आणि धारावी बस डेपोत धुळखात पडून आहेत.


पण खरं काय?

एकीकडे एमएमआरडीएचे संयुक्त प्रकल्प संचालक दिलीप कवठकर म्हणाले की बेस्टने प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाकडून परवानगी मागितलेली नाही. तर दुसरीकडे बेस्टच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी याआधीच या बसेस चालवण्यासाठी आरटीओकडून परमिट मिळवलं आहे.


या बसेस सुरू कधी होणार?

एमएमआरडीएने २५ हाइब्रिड इलेक्ट्रिक बसेस मागवल्या होत्या, त्यापैकी ५ बसेस सप्टेंबरमध्ये आणि ५ बसेस ऑक्टोबरमध्ये मुंबईत दाखल झाल्या होत्या. या बसेस वांद्रे कुर्ला संकुलात चालवल्या जाणार होत्या. पण त्या अजूनही आगारात पडून आहेत.हेही वाचा - 

वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये धावणार हायब्रिड बस

संबंधित विषय