वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये धावणार हायब्रिड बस

  Bandra
  वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये धावणार हायब्रिड बस
  मुंबई  -  

  लवकरच वांद्रे कुर्ला संकुलनात हायब्रिड बस धावणार आहेत. वातानुकूलितअसलेल्या या हायब्रीड बसमध्ये प्रवाशांना वायफाय, मोबाईल चार्जिंग, टीव्ही, एफएम अशा अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध असतील. या बसची प्रवासी क्षमता 59 इतकी असून 31 प्रवासी बसून तर 28 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकता येईल.


  बेस्टची मंजुरी

  अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) 25 हायब्रीड बसेस बेस्टला चालवण्यासाठी देणार आहे. या बसची देखभाल आणि उत्पन्नाबाबत एमएमआरडीएसोबत सामंजस्य करार करण्याला बेस्ट समितीने मंजुरीही दिली आहे.


  बिकेसीला स्मार्ट सिटी बनवणार

  आंतरराष्ट्रीय स्तरावर वांद्रे कुर्ला संकुलाचा विकास करण्याचे एमएमआरडीएने योजले आहे. त्याच अनुषंगाने बिकेसीला स्मार्ट सिटी करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी 25 हायब्रीड बसेस एमएमआरडीए प्रशासन बेस्टला देणार आहे. त्यातील 5 बसेस येत्या 15 ऑगस्टपासून बेस्टला उपलब्ध होण्याची शक्यता बेस्टचे महाव्यवस्थापक बागडे यांनी व्यक्त केली.

  या हायब्रीड बसची देखभाल आणि इतर खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे बागडे म्हणाले. सध्या बिकेसीत बेस्टच्या बस धावतात. त्यामुळे बेस्टला होणारा आर्थिक नुकसान देखील भरून मिळणार आहे. मात्र त्या बस कोणत्या मार्गावर चालवायच्या याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. या हायब्रीड बस टप्प्याटप्प्याने बसच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती बागडे यांनी दिली.


  हेही वाचा -

  मुंबईकरांसाठी खुशखबर! महिन्याभरात धावणार हायब्रीड बस!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.