मुंबईकरांसाठी खुशखबर! महिन्याभरात धावणार हायब्रीड बस!

BKC
मुंबईकरांसाठी खुशखबर! महिन्याभरात धावणार हायब्रीड बस!
मुंबईकरांसाठी खुशखबर! महिन्याभरात धावणार हायब्रीड बस!
See all
मुंबई  -  

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)कडून आंतरराष्ट्रीय स्तरावर वांद्रे-कुर्ला संकुलाचा विकास करण्यात येत आहे. त्यातूनच बीकेसीला स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्याचाही निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार बीकेसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी हायब्रीड अर्थात विद्युत, वातानुकुलित बस सुरू करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आता मुंबईकरांची हायब्रीड बसमधून गारेगार प्रवास करण्याची प्रतिक्षा महिन्याभरात संपणार आहे. बीकेसीत सॅम्पल हायब्रीड बस गुरुवारी दाखल झाली असून, 5 हायब्रीड बसेस महिन्याभरात बीकेसीत दाखल होणार आहेत. त्यामुळे महिन्याभरात बीकेसीतील रस्त्यांवरून हायब्रीड बसेस धावतील, अशी माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

टाटा मोटर्सकडून 25 हायब्रीड बस खरेदी करण्यात आल्या आहेत. मार्च 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही खरेदी करण्यात आली होती. एमएमआरडीएकडून ही बसखरेदी करण्यात आली असून, या बसेस चालवण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे हायब्रीड बस चालवण्याची आणि बसच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी बेस्टची असणार असल्याचेही दराडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, सव्वा वर्षांपूर्वी बसची खरेदी केल्याने प्रत्यक्ष बस कधी धावणार याचीच प्रतिक्षा मुंबईकरांना त्यातही बीकेसीत कामाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्यांना होती. आता ही प्रतिक्षा महिन्याभरात संपणार आहे. कारण गुरुवारी सॅम्पल बस दाखल झाली असून, या बसची तांत्रिक तपासणी केल्यानंतर बसला हिरवा कंदील देण्यात येईल. त्यानंतर पुढील चार आठवड्यात, अर्थात महिन्याभरात पाच बसेस बीकेसीत आणत त्या बेस्टकडे चालवण्यासाठी देण्यात येणार असल्याचेही दराडे यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा - 

स्मार्ट बीकेसीचं स्वप्न होणार साकार ?

मुंबई लाइव्हचा दणका, बीकेसीतील पार्किंगचं शटर उघडलं

बीकेसीतून 2022 मध्ये धावणार पहिली बुलेट ट्रेन


बीकेसी ते वांद्रे स्थानक, बीकेसी ते कुर्ला आणि बीकेसी ते सायन अशा या बसेस धावणार आहेत. या बसेस पूर्णत: वातानुकूलित असल्याने प्रवास गारेगार होणार आहे. 5 बसेस महिन्याभरात तर पुढील 20 बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होतील असेही दराडे यांनी सांगितले. वातानुकूलित बसेसमुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहेच. पण या बॅटरीवर चालणाऱ्या बसमध्ये प्रवाशांना वायफाय, मोबाईल चार्जिंग, टीव्ही, एफएम अशा पंचतारांकित सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत हे विशेष. तर या बसची प्रवासी क्षमता 59 इतकी आहे. 31 प्रवासी बसून तर 28 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकणार आहेत. दरम्यान, एका बसची किंमत 1 कोटी 67 लाख इतकी आहे. त्यानुसार या 25 बसच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने 50 कोटींचा खर्च केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या बसचे तिकीट दर हे सध्याच्या बेस्ट बसच्या वातानुकूलित बस इतकेच असणार असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.