Advertisement

मुंबई लोकलचं 'शाॅकिंग' सत्य!

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे जीव धोक्यात घालून रेल्वेच्या टपावरून प्रवास करणाऱ्यांच्या मृत्यूचा आकडाही लक्ष वेधणारा ठरत आहेत. मागील ५ वर्षांत ओव्हरहेड वायरचा 'शाॅक' लागून तब्बल १४३ जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांनी रेल्वे प्रशासनाकडून माहितीच्या आधाराखाली मिळवलेल्या माहितीत पुढं आली आहे.

मुंबई लोकलचं 'शाॅकिंग' सत्य!
SHARES

मुंबईची लाईफ लाइन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे प्रवाशांसासाठी 'डेथ लाइन' म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर दिवसाला १७ ते १८ अपघात होत असून त्यात ९ जणांचा मृत्यू होत आहे. तर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे जीव धोक्यात घालून रेल्वेच्या टपावरून प्रवास करणाऱ्यांच्या मृत्यूचा आकडाही लक्ष वेधणारा ठरत आहेत. मागील ५ वर्षांत ओव्हरहेड वायरचा 'शाॅक' लागून तब्बल १४३ जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांनी रेल्वे प्रशासनाकडून माहितीच्या आधाराखाली मिळवलेल्या माहितीत पुढं आली आहे.

मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरून दिवसाला ७० ते ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मागील काही वर्षांपासून प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू केले असले, तरी सुरक्षा नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळेच रेल्वेच्या अपघातांचा आलेख वाढताच आहे. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांनी रेल्वे पोलिसांकडून माहिती मागवली.


१४३ प्रवाशांचा मृत्यू

या माहितीनुसार सन २०१३ पासून मे २०१८ पर्यंत ओवरहेड वायर पासून शॉक लागून एकूण १४३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. तर ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यामुळे १३८ प्रवासी आतापर्यंत जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत स्थानकांदरम्यान एकूण ६७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण ५२ प्रवासी जखमी झाले आहेत.


कुठे सर्वाधिक मृत्यू?

तसंच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर स्थाकांन दरम्यान एकूण ४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण ३१ प्रवासी जखमी झाले आहे. तसेच हार्बर रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड ते पनवेल स्थानकांदरम्यान एकूण ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण ३९ प्रवासी जखमी झाले आहे. सर्वात जास्त ओव्हर हेड वायरचा शॉक लागून प्रवाशांचा मृत्यू चेंबूर आणि टिळक नगर स्थाकांन दरम्यान झाला आहे. चेंबूर स्थानकावर एकूण ११ प्रवाशांचा मृत्यू व ६ प्रवासी जखमी झाले आहे. तसेच टिळक नगर स्थानकावर एकूण ५ प्रवाशांचा मृत्यू व १४ प्रवासी जखमी झाले आहे. तर रेल्वेतून पडून २०१७ मध्ये ३०१४ प्रवाशांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.



हेही वाचा-

मेट्रोची धाव आता भाईंदरपर्यंत!

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही मिळणार 'प्रमोशन'



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा