Advertisement

तिकिट दलालांकडून अडीच लाखांची आरक्षित तिकिटे जप्त


तिकिट दलालांकडून अडीच लाखांची आरक्षित तिकिटे जप्त
SHARES

अनधिकृत तिकिट विक्रेते आणि दलालांविरोधातील मध्य रेल्वेची मोहीम आणखी तीव्र झाली आहे. वाणिज्‍य विभाग, रेल्‍वे सुरक्षा दल आणि दक्षता विभागामार्फत दलालखोरीला आळा घालण्‍यासाठी संयुक्‍तरित्‍या ही मोहीम राबवण्‍यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ८ अनधिकृत दलाल सापडले असून त्‍यांच्‍याकडून २ लाख ५८ हजार ४१५ किंमतीची ९० आरक्षित तिकिटे जप्त करण्यात आली. मध्‍य रेल्‍वेच्‍या विविध स्‍थानक आणि परिसरात ही तपासणी करण्‍यात आली.


अनधिकृत साॅफ्टवेअरचा वापर

या अभियानात २ बेकायदा दलाल सापडले जे तिकिट रांगा टाळून जलद तिकिटे मिळवण्‍यासाठी अनधिकृत सॉफ्टवेअरचा वापर करत होते. अनधिकृत तिकीटांसोबतच २ लॅपटॉप, २ डेस्‍कटॉप संगणक जप्‍त करण्यात आले आहेत. या सर्व दलालांना चौकशीसाठी अटक करुन पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

या अभियानाअंतर्गत संग‍णकीय आरक्षण केंद्रात अवैधरित्‍या तिकिट खरेदी किंवा कोणतेही गैरप्रकार न होण्‍यासाठी नजर ठेवण्‍यात आली होती. महत्‍वाच्या स्‍थानकावर तिकिट रांगांवर लक्ष ठेवण्‍यात आलं होते. या दलालांना वेगवेगळ्या स्थानकांवरुन अटक करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा