मध्य रेल्वे (central railway) ट्रेन क्रमांक 12219 / 12220 लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)-सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेसमध्ये कायमस्वरूपी 2 स्लीपर कोच जोडणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
ट्रेन क्रमांक 12219 / 12220 लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद (secundarabad) दुरांतो एक्सप्रेस (duronto express)
जुनी रचना
एक फर्स्ट एसी, चार एसी-2 टायर, दहा एसी-3 टायर, 1 सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, 1 जनरेटर कार आणि 1 पॅन्ट्री कार. – 18 कोच
सुधारित रचना
एक फर्स्ट एसी, चार एसी-2 टायर, दहा एसी-3 टायर, 2 स्लीपर कोच, 1 सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, 1 जनरेटर कार आणि 1 पॅन्ट्री कार. - 20 कोच
ट्रेन क्रमांक 12219 लोकमान्य टिळक टर्मिनस -सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस 17.09.2025 पासून सुधारित रचनेसह चालेल.
ट्रेन क्रमांक 12220 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस 16.09.2025 पासून सिकंदराबादच्या सुधारित रचनेसह धावेल.
आरक्षण: ट्रेन क्रमांक 12219 मध्ये अतिरिक्त स्लीपर कोचसाठी बुकिंग 10.09.2025 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
या गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
हेही वाचा