Advertisement

मध्य व पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा मोबाइल तिकीटविक्री उत्तम प्रतिसाद

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटीसाठी रांगेत उभं राहायला लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना मोबाईल तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा मोबाइल तिकीटविक्री उत्तम प्रतिसाद
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटीसाठी रांगेत उभं राहायला लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना मोबाईल तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, मार्च महिन्यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर मोबाइलद्वारे १३ लाख ७९ हजार ६७७ तिकीटांची विक्री झाली, तर पश्चिम रेल्वे मार्गावर ८ लाख ८८ हजार ६२९ तिकिटांची विक्री झाली आहे. मार्च महिन्यात तब्ब्ल २२ लाख मोबाईल तिकीटांची विक्री झाली आहे.


जनजागृती मोहीम

काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सुविधा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातील या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं 'जनजागृती मोहीम' राबवली होती. ही मोहिम रेल्वेनं तिकीट खिडक्यावर, स्थानकांत स्टॉल उभारून प्रवाशांना मोबाइल तिकीट सेवेची माहिती देण्यात येत होती. त्यामुळं काळात या सुविधेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतं आहे. 


प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ यादरम्यान मध्य व पश्चिम रेल्वेवरील मोबाइल तिकीट या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय पश्चिम रेल्वेपेक्षा मध्य रेल्वेवर या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल २०१८ मध्ये मध्य रेल्वेवर ३ लाख ६५ हजार ७२९ इतकी तिकीट विक्री झाली. तसंच, पश्चिम रेल्वेवर २ लाख ५५ हजार २२५ तिकिटांची विक्री झाली होती. मात्र, मार्च २०१९ मध्ये मार्च महिन्यात १३ लाख ७९ हजार ६७७ मोबाइल तिकिटांची विक्री झाली, तर पश्चिम रेल्वेवर ८ लाख ८८ हजार ६२९ तिकिटांची विक्री झाली आहे.



हेही वाचा -

मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानं किरीट सोमय्यांचा पत्ता कट - संजय निरुपम

मुंबई सत्र न्यायालयाशेजारील धोकादायक इमारत १५ मेपर्यंत खाली करा - हायकोर्ट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा