बेस्टनं (Best bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, प्रवाशांच्या (Passenger) तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळं बेस्ट बसवरी प्रवासी ताण कमी करण्यासाठी व गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी बेस्ट उपक्रमानं एसटी गाड्यांची मदत घेतली. बेस्टच्या ताफ्यात एसटी (MSRTC ST) दाखल झाल्यानं प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील १५ दिवसांत बेस्टच्या मार्गावर धावणाऱ्या एसटीतून एक लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे.
बेस्टची प्रवासी संख्या २१ सप्टेंबपर्यंत १६ लाखांपर्यंत होती. बसगाड्यांना प्रचंड गर्दी होऊ लागल्याने सामाजिक अंतराचा नियमांचं उल्लंघन होत होतं. त्याशिवाय कमी पडणाऱ्या गाड्या आणि वाहतुककोंडी यामुळे बेस्ट थांब्यावर प्रवासी बसची तासन्तास वाट पाहू लागले. परिणामी काहींना रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडावा लागला.
अखेर २४ सप्टेंबरपासून बेस्टच्या मदतीला एसटी दाखल करण्याचा निर्णय घेतला. बेस्टच्या मार्गावरच या एसटी धावू लागल्यानं प्रवाशांना झटपट सेवा मिळू लागली. त्यातच लॉकडाऊन शिथिलतेमुळं वाढलेल्या प्रवाशांनी याच एसटीतूनही प्रवासाचा पर्याय निवडल्याचेही दिसून येत आहे.
बेस्टच्या मदतीला एकूण १००० एसटी दाखल करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आणखी ५२० बसही मदतीला लवकरच येणार असल्याची माहिती मिळते. एसटी गाड्या दर किलोमीटर मागे ७५ रुपये भाडेदरानं घेण्यात आल्या असून त्यातूनच एसटी महामंडळाला इंधन, देखभाल, चालक, वाहकाचा खर्च मुंबई पालिका, बेस्ट उपक्रमाकडून दिला जाणार आहे.
हेही वाचा -
प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस
मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता