Advertisement

बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेचे ५० कोटी

कोरोनाकाळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मिळणार आहेत

बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेचे ५० कोटी
SHARES

कोरोनाकाळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मिळणार आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य देता यावे यासाठी महापालिकेने बेस्टला ५० कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. याबाबत प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर कार्योत्तर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

बेस्टमध्ये कोरोनामुळं सुमारे १०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनानं भरपाईपोटी ५० लाख रुपये दिले आहेत. त्याबाबत प्रक्रियाही सुरू आहे. तसंच, बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठीही योजना असावी आणि महापालिकेनं अर्थसाहाय्य करावं, अशी विनंती बेस्ट उपक्रमानं महापालिकेकडं केली होती.

महापालिका प्रशासनानं २०२०-२१ च्या म्हणजेच चालू अर्थसंकल्पातच सुधारित तरतूद केली आहे. बेस्टनं कोरोनाच्या सुरुवातीच्या कालावधीपासून आपत्कालीन सेवा पुरविण्याचं काम केलं. लोकल गाड्या बंद होत्या. त्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बेस्टनं प्रवास करीत होते. मात्र, या काळात बेस्टचे १०० कामगार कोरोनानं मृत्युमुखी पडले. महापालिकेनं कोरोनामुळं मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांप्रमाणं ५० कोटी रुपये अर्थसाहाय्य बेस्ट उपक्रमाला दिले आहे.



हेही वाचा - 

नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जा, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा