Advertisement

खूशखबर! एसटीत ६,९४९ चालक-वाहकांची भरती

गेल्या वर्षी मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि कोकणात सुमारे पाच हजार जागा भरल्या आहेत. पण तरीही वाहक-चालकांची संख्या अपुरी असल्यानं आता उर्वरित विभागांमध्ये जागा भरण्याचा निर्णय एसटीनं घेतला आहे.

खूशखबर! एसटीत ६,९४९ चालक-वाहकांची भरती
SHARES

दिवाळीच्या मुहुर्तावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) नं बेरोजगारांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. एसटीनं ६ हजार ९४९ वाहक-चालकांच्या जागा भरण्याचा निर्णय घेतला असून यासाठी नोव्हेंबरच्या अखरेीस जाहिरात निघेल अशी माहिती एसटीचे व्यवस्थापकिय संचालक रणजितसिंग देओल यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. पुणे, नागपुर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या विभागांसाठी ही भरती होणार  आहे. तर मुंबई विभागातही भरती होण्याची शक्यता असून तसा विचार एसटीकडून सुरू आहे.


संख्या अपुरी

एसटीकडे आजच्या घडीला अंदाजे ३८ हजार चालक तर अंदाजे ३४ हजार वाहक आहे. पण गेल्या काही वर्षात एसटीच्या गाड्यांची आणि फेऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे कर्मचारी निवृत्त होत असून नवी भरती होत नसल्यानं वाहक-चालकांची कमतरता एसटीत जाणवत आहे. त्यामुळं एसटीनं वाहक-चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि कोकणात सुमारे पाच हजार जागा भरल्या आहेत. पण तरीही वाहक-चालकांची संख्या अपुरी असल्यानं आता उर्वरित विभागांमध्ये जागा भरण्याचा निर्णय एसटीनं घेतला आहे.


फेब्रुवारी मध्ये परीक्षा

या निर्णयानुसार औरंगाबाद, पुणे, अमरावती, नाशिक आणि नागपुर विभागातील ६,९४९ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी नोव्हेंबर अखेरीस जाहिरात निघेल. त्यानुसार अर्ज स्वीकृती करत परिक्षा घेत या जागा भरण्यात येतील. जाहिरात आणि अर्जाची प्रक्रिया पार पाडत फेब्रुवारी २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा - 

'पेट' आणि 'नेट' एकाच दिवशी; विद्यापीठाचा नवा गोंधळ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा