Advertisement

सीएसटीएमच्या कारशेडमधील सोलापूर एक्स्प्रेसला आग


सीएसटीएमच्या कारशेडमधील सोलापूर एक्स्प्रेसला आग
SHARES

रविवारी गोरेगावमधील टेक्निक वन प्लस इमारतीला आग लागून त्यात ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचं हे सत्र मंगळवारीही कायम राहिलं असून मंगळवारी काही तासांच्या फरकातच मुंबईत २ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनाी मालाड एमएम मिठाईवाला या दुकानाला आग लागली. तर दुपारी ३.१५ वाजेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम)च्या कारशेडमध्ये उभ्या सोलापूर एक्स्प्रेसच्या एका बोगीला भीषण आग लागली. सुदैवाने बोगी कारशेडमध्ये असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.
क्लिनिंगचं काम सुरू असताना...

प्लॅटफाॅर्म क्रमांक १८ वर सोलापूर एक्स्प्रेसच्या दुरूस्ती आणि क्लिनिंगचं काम सुरू असताना एक्स्प्रेसच्या एका बोगीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्यानंतर अथक प्रयत्नाने अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग ४.३० वाजेच्या सुमारास विझवली. टर्मिनसमध्ये धुराचे लोळ

आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ बाहेर पडत असल्याने आग विझवणं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अवघड होत होतं. आजूबाजूला धुराचा लोळ पसरल्यानं टर्मिनस परिसरातील लोकांनाही श्वसनाचा त्रास झाला. सीआरएफचे जवान आणि रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केलं. हेही वाचा-

गोरेगाव आग प्रकरणी तिघांना अटकRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा