Advertisement

एेन गर्दीच्या वेळेत मेट्रोत तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

एेन गर्दीच्या वेळेस सकाळी दहाच्या सुमारास एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर मेट्रो गाडीत तांत्रिक बिघाड झाला आहे.

एेन गर्दीच्या वेळेत मेट्रोत तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप
SHARES

बेस्ट बसचा संप असल्यानं प्रवाशांचे आधीच हाल असताना पर्याय म्हणून मेट्रोची निवड करणार्या प्रवाशांना शुक्रवारी सकाळी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. एेन गर्दीच्या वेळेस सकाळी दहाच्या सुमारास एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर मेट्रो गाडीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मेट्रो गाडीतील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर तांत्रिक बिघाड दुर करत पाच मिनिटांनंतर मेट्रोची वाहतुक सुरळीत करण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)च्या प्रवक्त्याने मुंबई लाईव्हला दिली आहे.


प्रवाशांसाठी अतिरिक्त १२ फेऱ्या 

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ३० हजारांहून अधिक कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे, टॅक्सी-रिक्षा, खासगी वाहतुक यासह मेट्रोचाही मोठ्या प्रमाणावर आधार घेतला आहे. त्यामुळेच मंगळवारपासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेला धावून आली असून मेट्रोकडून गेल्या चार दिवसांपासून १२ अतिरिक्त फेर्या चालवल्या जात आहेत. मेट्रोच्या प्रत्यके स्थानकावर नेहमीपेक्षा प्रवाशांची अधिक गर्दी आहे. 


मेट्रो वाहतुक सुरळीत 

असं असताना शुक्रवारी एेन गर्दीच्या वेळेस मेट्रो गाडीत तांत्रिक बिघाड झाला नि मेट्रो सेवा ५ ते ८ मिनिटांसाठी ठप्प झाली. घाटकोपरकडून वर्सोव्याकडे जाणारी मेट्रो गाडी सकाळी दहाच्या सुमारास एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर आली असता मेट्रो गाडी अचानक बंद पडली. काही तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आल्याबोरबर एमएमओपीएलच्या कर्मचार्यांनी धाव घेत गाडीतील प्रवाशांना त्वरीत खाली उतरवलं. त्यानंतर पुढील पाच मिनिटांत तांत्रिक बिघात दुर करत मेट्रो सेवा सुरळीत करण्यात आली. सध्या मेट्रोची वाहतुक सुरळीत सुरू असल्याचंही एमएमओपीएलच्या प्रवकत्यानं सांगितलं आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा