Advertisement

धिम्या मार्गावरही धावणार एसी लोकल?

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी व गारेगार प्रवासाची संधी मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनानं एसी लोकल सुरू केली आहे.

धिम्या मार्गावरही धावणार एसी लोकल?
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी व गारेगार प्रवासाची संधी मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनानं एसी लोकल सुरू केली आहे. मात्र, या एसी लोकलला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या एसी लोकल गाडीला अद्यापही थंड प्रतिसाद मिळत आहे. दिवसाची साधारण ६ हजार प्रवासी क्षमता असताना प्रत्यक्षात ५ महिन्यांत मिळून ७ हजारांच्या आसपास तिकीट विक्री झाली आहे. त्यामुळं आता जलद मार्गावर धावत असलेल्या गाडीला धीम्या मार्गावर चालवून काही प्रतिसाद मिळतो का याची चाचपणी पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये ही सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊनच्या शिथिलीकरणात पश्चिम रेल्वेनं १५ ऑक्टोबरपासून पुन्हा एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत आणली. दिवसाला या सेवेच्या १२ फेऱ्या होतात. सेवेत येताच सुरुवातीच्या ३० दिवसांत फक्त ३४१ तिकीट व ३१५ पासची विक्री झाली होती. फेब्रुवारीपर्यंत एकूण ६ हजार ८६१ तिकिटांची आणि १० हजार ७८० पास विक्री झाली आहे.

१ मार्चला २६४ तिकिटे आणि २६२ पास प्रवाशांनी घेतल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितलं. आतापर्यंत एकूण सप्टेंबरपासून एसी लोकल सेवेत येताच एकूण ९१ लाख १८ हजार रुपये महसूल रेल्वेला मिळाला आहे. तिकीट विक्री व महसूल पाहता तो फार कमी आहे. परिणामी प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या ही लोकल जलद मार्गावर सुरू आहे. धिम्या मार्गावरही एसी लोकल चालवण्याचा विचार आहे.

मध्य रेल्वेवर सध्या धिम्या मार्गावर एसी लोकल धावत आहे. जलद मार्गावरही एसी लोकल चालवण्याचा प्रस्ताव साधारण एक महिन्यापूर्वी तयार करण्यात आला होता. परंतु हा प्रस्तावही मागे पडला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा