Advertisement

अखेर मध्य रेल्वेवर एसी लोकल आलीच

पश्चिम रेल्वेपाठोपाठ अखेर मध्य रेल्वेवर एसी लोकल धावणार आहे.

अखेर मध्य रेल्वेवर एसी लोकल आलीच
SHARES

पश्चिम रेल्वेपाठोपाठ अखेर मध्य रेल्वेवर एसी लोकल धावणार आहे. पश्चिम रेल्वेप्रमाणं आता गारेगार प्रवासाची संधी मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही मिळणार आहे. येत्या नववर्षात मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल धावणार आहे. ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे. त्याशिवाय, नवीन वर्षांत आणखी ५ लोकल दाखल होणार असून, या लोकलचं वेळापत्रकही तयार करण्यात आलं आहे. एसी लोकल मुंबईत दाखल झाल्यानंतर मध्य रेल्वेवर चाचणी घेण्यात आली होती. मध्य रेल्वेवर एसी लोकल आली असली तरी प्रवाशांचे हाल आणि अपुऱ्या सुविधा यामुळं या एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मध्य रेल्वेवर एकूण ६ वातानुकूलित लोकल येणार आहे. यामधील पहिली लोकल जानेवारी महिन्यात ट्रान्स हार्बरवर धावणार आहे. त्याच्या अप मार्गावर ८ आणि डाऊन मार्गावर ८ अशा एकूण १६ फेऱ्या दिवसभरात होणार आहेत. यामध्ये काही फेऱ्या गर्दीच्या वेळी होणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मार्च महिन्यापर्यंत आणखी एक लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणार आहे. तर उर्वरित ४ लोकल डिसेंबपर्यंत टप्प्याटप्प्यात येणार आहेत.

ट्रान्स हार्बरवर वातानुकूलित लोकलचं वेळापत्रक तयार असतानाच सीएसएमटी ते पनवेल हार्बर आणि सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गाचेही वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. हार्बरवरही एकच लोकल चालवताना त्याच्या अप मार्गावर ७ आणि डाऊन मार्गावर ६ फेऱ्या होणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर तीन वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन केले असून त्यांच्या २७ फेऱ्या होणार आहेत. यात डाऊन मार्गावर १५ आणि अप मार्गावर १२ फेऱ्या होणार आहेत.

एसी लोकलची वैशिष्ट्ये :

  • १२ डबा एसी लोकल, स्टेनलेस बॉडी
  • स्वयंचलित दरवाजे, मोठ्या काचेच्या खिडक्या
  • एका डब्यातून दुसऱ्या डब्यात प्रवेश करता येणार
  • प्रवाशांना लोकलच्या गार्ड आणि मोटरमनशी संपर्क साधता यावा यासाठी डब्यात टॉक बॅक यंत्रणा
  • स्वयंचलित चेतावणी देणारी अलार्म यंत्रणा
  • दरवाजा न उघडल्यास प्रवासीही दरवाजा उघडू शकतील अशी व्यवस्था
  • डब्यात प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा
  • लोकलमध्ये १,०२८ आसनांची क्षमता आहे तर ५,९३६ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील
  • मेक इन इंडियाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या या लोकलच्या निर्मितीसाठी ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
  • विद्युत यंत्रणेचे काम भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड (भेल)ने केले आहे.
  • चेन्नईतील इंट्रिगल कोच फॅक्टरी (आयसीएफ)मध्ये त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या मार्गावर २५ डिसेंबर २०१७ मध्ये धावली. मात्र, ही लोकल खरतरं मध्य रेल्वेवर धावणार होती. प्रवाशांना गारेगार प्रवास करता यावा यासाठी ही लोकल मध्य रेल्वे दाखल झाली. त्यानंतर या लोकलची चाचणी घेण्यात येणार होती. परंतु, चाचणीदरम्यान या मार्गावर असलेल्या पूलांची उंची कमी असल्यानं ही लोकल चालविण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते. तसंच, अनेक तांत्रित अडचणींना तोंड द्याव लागत होतं. त्यामुळं ही लोकल पश्चिम रेल्वेवर चालविण्यात आली. बोरिवली-चर्चगेट मार्गावर एसी लोकल सुरू करण्यात आली. त्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून या लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला. रेल्वे स्थानकांतील आवाजापासून मुक्ती, स्वयंचलित दरवाज्यांमुळं अपघाताची भीती न राहणं, यांमुळं मुंबईकर एसी लोकलकडं वळले. यामध्ये पासधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ न झाल्यानं प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.

अखेर २ वर्षानंतर मध्य रेल्वे मार्गावर पहिला एसी लोकल धावणार आहे. त्यामुळं या मार्गावरील प्रवाशांची प्रतिक्षा आता संपणार आहे. दरम्यान असं असलं तरी, या लोकलच्या प्रतिसादावरून प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सध्यस्थितीत साध्या लोकलच्या प्रवासाला प्रवासी कंटाळले आहेत. रोजचा लेट मार्क, तुफान गर्दी, धक्काबुक्की, अपघात, जीव धोक्यात, अपुऱ्या सुविधा यांसारख्या अनेक कारणांमुळं प्रवास नकोसा वाटतो आहे. त्यासाठी तक्रारीही प्रवाशांनी प्रवासी संघटनांच्या माध्यमातून केल्या. त्यानंतर पत्रव्यवहार, मागण्या, पर्याय नसल्यामुळं कंटाळून आंदोलन केली. मात्र त्यांच्या वाटेला अद्याप निराशाच आली आहे. त्यामुळं ही लोकल फायदेशीर ठरेल असे वाटत नाही.

साध्या लोकलला दिवसेदिवस गर्दी वाढते आहेत. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच एसी लोकल म्हणजे तांत्रिक अडचणी आल्याच. त्यामुळं आधीच लोकल फेऱ्या उशीला आणि ऐन प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळं वेळही वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या तांत्रिक अडचणी यामध्ये मुख्यत: स्वयंचलित दरवाजा बंद न होणं त्यामुळं त्याच्या दुरूस्तीसाठी २० ते २५ मिनिटं लागतात. असे प्रॉब्लेम्स मध्य रेल्वेवरील एसी लोकलमध्ये उद्भवल्यास प्रवाशांचं मोठं नुकसान होणार आहे.

दरम्यान, एसी लोकल सुरू करायचं म्हटलं तर वेळापत्रकात बदल करावा लागतो. त्यानुसार, साध्या लोकलच्या वेळा बदलणं बंधनकारक असतं. परंतु, मध्य रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्या आणि त्यांचं वेळापत्रक हे प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत खूपच कमी आहे. यासाठी प्रवासी लोकल व त्यांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी वारंवार करत आहेत, असो... पण एसी लोकल सुरू झाल्यास त्या लोकलचे तिकीट दर हे सामान्या प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळं लोकलच्या वेळापत्रकात बदल केल्यास ज्या लोकलच्या जागी एसी लोकल धावणार आहे, त्या लोकलची प्रवाशांची गर्दी आणि त्यानंतर स्थानकात होणारी प्रवाशांची गर्दी यामुळं लोकलला क्षमतेपेक्षा जास्त ग्रदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



हेही वाचा -

IPL 2020 : तेराव्या हंगामासाठी 'असा' आहे मुंबई इंडियन्सचा संघ

लोकेशन मोड बंद असलं तरी फेसबुकला कळतं लोकेशन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा