Advertisement

वाहतुकिचे नियम तोडल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो - नितीन गडकरी

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केंद्रातील मोदी सरकार नवा नियम आणणार आहे.

वाहतुकिचे नियम तोडल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो - नितीन गडकरी
SHARES

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केंद्रातील मोदी सरकार नवा नियम आणणार आहे. यानुसार, कुणी वाहतुक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होणार आहे. याबाबतची माहिती स्वत: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

नितीन गडकरी उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमासाठी हजर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लवकरच महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवरील वेगाबाबत नवीन नियम करण्यात येणार आहे. जर कोणी वाहतुक नियमांचे उल्लंघन केले, तर ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल, जे पुरावे बनतील आणि त्याआधारे गुन्हा दाखल होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, केंद्राकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार जर तुम्ही नियमांचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास तुम्हाला आठ ते दहा पट अधिक दंड भरावा लागणार आहे.

रविवारी मध्यरात्रीपासून नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. दंडाची रक्कम वाढवण्यात आल्यानं, वाहनचालक नियमांचे उल्लंघ करणे टाळतील आणि अपघाताला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उंल्लघन केल्यास पूर्वी २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. सुधारीत नियमानुसार तुम्ही जर पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले तर पहिल्या वेळेस ५०० रुपये तर दुसऱ्या वेळेस १५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

परवाना नसताना वाहन चालवल्यास आता तुम्हाला तब्बल ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पूर्वी परवाना नसताना वाहन चालवण्यासाठी केवळ ५०० रुपयांची तरतूद होती. जर तुमच्याकडे वाहनांचे अधिकृत कागदपत्रे नसतील तर तुमच्याकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता.



हेही वाचा

वाहतुकीचे नवे नियम लागू, उल्लंघन करणं पडेल महागात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा