Advertisement

वाहतुकीचे नवे नियम लागू, उल्लंघन करणं पडेल महागात

केंद्राकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीचे नवे नियम लागू, उल्लंघन करणं पडेल महागात
SHARES

केंद्राकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार जर तुम्ही नियमांचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास तुम्हाला आठ ते दहा पट अधिक दंड भरावा लागणार आहे.

रविवारी मध्यरात्रीपासून नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. दंडाची रक्कम वाढवण्यात आल्यानं, वाहनचालक नियमांचे उल्लंघ करणे टाळतील आणि अपघाताला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उंल्लघन केल्यास पूर्वी २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. सुधारीत नियमानुसार तुम्ही जर पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले तर पहिल्या वेळेस ५०० रुपये तर दुसऱ्या वेळेस १५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

परवाना नसताना वाहन चालवल्यास आता तुम्हाला तब्बल ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पूर्वी परवाना नसताना वाहन चालवण्यासाठी केवळ ५०० रुपयांची तरतूद होती. जर तुमच्याकडे वाहनांचे अधिकृत कागदपत्रे नसतील तर तुमच्याकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता.

विनाकारण हॉर्न वाजवल्यास पूर्वी २०० रुपयांचा दंड होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता विनाकारण हॉर्न वाजल्यास पहिल्यावेळी पाचशे तर दुसऱ्यावेळी तब्बल १५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

जर तुम्ही विनाहेल्मेट गाडी चालवताना आढळल्यास पहिल्यावेळेस ५०० रुपयांचा तर दुसऱ्या वेळेला दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. पूर्वी दंडाची ही रक्कम केवळ ५०० रुपये इतकी होती.



हेही वाचा

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व महिला डब्यांत सीसीटीव्ही

अंबरनाथ स्थानकाला हेरिटेज दर्जा देण्याची मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा