Advertisement

रेल्वे स्थानक हद्दीत आणखी ३०० मार्शलची होणार नियुक्ती

या लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवासी हे मास्क घालत नसून समाजिक अंतराच्या नियमांचं पालनही करत नाहीत. अशा प्रवाशांविरोधात करावाई करण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे.

रेल्वे स्थानक हद्दीत आणखी ३०० मार्शलची होणार नियुक्ती
SHARES

कोरोना काळात बंद असलेली लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवासी हे मास्क घालत नसून समाजिक अंतराच्या नियमांचं पालनही करत नाहीत. अशा प्रवाशांविरोधात करावाई करण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या रेल्वे प्रवाशांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यासाठी मुंबई पालिकेकडून मध्य, पश्चिम रेल्वे स्थानक हद्दीत अतिरिक्त ३०० मार्शल नियुक्त केले जाणार आहेत.

कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मार्शलसोबत गरजेनुसार दोन लोहमार्ग पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. सध्या रेल्वे स्थानकांचे प्रवेशद्वार, पालिका व रेल्वे पादचारी पुलांवरून बाहेर पडण्याचे मार्ग आदी ठिकाणी महापालिकेकडून कारवाईसाठी मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, मागील काही दिवसांत उपनगरीय प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. तर मास्कचा वापर न करणाऱ्यांचं प्रमाणही अधिकच आहे.

त्या तुलनेत मार्शलची संख्या अपुरीच पडते. मार्शलकडून कारवाई सुरू झाल्यानंतरही मास्कविना फिरणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेले नाही. परिणामी कारवाई तीव्र करण्यासाठी महापालिकेकडून रेल्वे स्थानक हद्दीत आणखी ३०० मार्शल नियुक्त करण्यात येणार आहेत. हे मार्शलही रेल्वे स्थानकातील पादचारी पूल, फलाट, लोकलमध्ये फिरूनही मास्कविना फिरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करणार आहेत.

कारवाई अधिक तीव्रतेनं करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, प्रवासी व मार्शलमध्ये वाद होऊ नये यासाठी गरजेनुसार किंवा त्यांच्या विनंतीनुसार, लोहमार्ग पोलिसांनी मनुष्यबळ देण्याची तयारी दर्शवली आहे. अतिरिक्त एक महिला व एक पुरुष लोहमार्ग पोलीस प्रत्येक स्थानकात तैनात केले जाणार आहेत. पश्चिम व मध्य रेल्वेवर एकूण १४४ उपनगरीय स्थानकं असून, २८८ अतिरिक्त लोहमार्ग पोलीस तैनात होणार असल्याचं समजतं.

रेल्वे स्थानक हद्दीत आणखी ३०० मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. त्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यांच्या कारवाईत रेल्वे पोलीसही सहभागी होतील. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास व मार्शलकडून कारवाई करताना प्रवाशांनी अडथळा आणल्यास एका महिन्याचा साधा कारावास आणि त्यादरम्यान मार्शलला मारहाण केल्यास सहा महिन्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा