Advertisement

इटली, दक्षिण कोरियाला जाणारी विमानं रद्द

चीन (china) नंतर इटली (Italy) आणि दक्षिण कोरियामध्ये ( South Korea) कोरोनाचा (coronavirus) प्रसार वेगाने झाला आहे. या देशांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

इटली, दक्षिण कोरियाला जाणारी विमानं रद्द
SHARES

कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रसार वेगाने होत असल्याने आता आवश्यक पावलं उचलली जात आहे. सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने आता एक मोठं पाऊल उचललं आहे. एअर इंडियाने (air india)  इटली (Italy) आणि दक्षिण कोरियाला ( South Korea) जाणारी विमाने (flights) रद्द (canceled) केली आहेत. 

चीन (china) नंतर इटली (Italy) आणि दक्षिण कोरियामध्ये ( South Korea) कोरोनाचा (coronavirus) प्रसार वेगाने झाला आहे. या देशांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इटलीत आतापर्यंत १०१४९ रुग्ण आढळून आले आहेत. यामधील १६८ जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याआधी रविवारी इटलीत १३२ जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी सकाळपर्यंत इटलीत ६३१ जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. एअर इंडियाने २८ मार्चपर्यंत इटली तर दक्षिण कोरियाला जाणारी विमाने २५ मार्चपर्यंत रद्द केली आहेत.

१०९  देशांमध्ये १ लाख १३ हजार २५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. २०  हून अधिक देशांमध्ये ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत कोरोना विषाणूच्या सकंटामुळे सरकारने सर्व शाळा आणि विद्यापीठे १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील नागरिकांना घरातच थांबण्याची सूचना केली जात आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी इटलीत ठिकठिकाणी तपासणी नाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला. १५ एप्रिलपर्यंत ही स्थगिती दिली आहे. यातून केवळ डिप्लोमॅटीक व्हिसा, युएन व्हिसा आणि इतर ऑफिशिअल व्हिसा(coronavirus) यांना वगळण्यात आले आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत.



हेही वाचा -

शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्समध्ये ३०८० अंकांची ऐतिहासिक घसरण

Coronavirus: शालेय विद्यार्थ्यांना सॅनिटायजर आणण्याची सूचना




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा