Advertisement

Coronavirus: शालेय विद्यार्थ्यांना सॅनिटायजर आणण्याची सूचना

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोठ्या वर्गातील मुलांसह लहान मुलांनादेखील सॅनिटायजर आणण्याच्या सूचना मुंबईतील काही शाळांनी दिलेल्या आहेत

Coronavirus: शालेय विद्यार्थ्यांना सॅनिटायजर आणण्याची सूचना
SHARES

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर सगळीकडं खबरदारी घेतली जात आहे. रुग्णालय (Hospital), दवाखाने (Clinic), शाळा (School), कॉलेज (College) यांसारख्या ठिकाणी सतर्क राहण्याचे सल्ले दिले जात आहेत. अशातच कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोठ्या वर्गातील मुलांसह लहान मुलांनादेखील सॅनिटायजर (Sanitizer) आणण्याच्या सूचना मुंबईतील काही शाळांनी दिलेल्या आहेत. अल्कोहोल (Alcohol) आणि रसायनयुक्त सॅनिटायझर लहान मुलांना वापरायला द्यावे का, अशा शंका उपस्थित करत काही पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शाळेत मुलांना सॅनिटायजर (Sanitizer) वापरण्याचा निर्णय मुंबई उपनगरासह (Mumbai Suburban) ठाण्यातील (Thana) काही शाळांनी घेतला आहे. यासाठी मुलांना शाळेत सॅनिटायजर देण्याच्या सूचनाही पालकांना केलेल्या आहेत. सॅनिटायझरच्या वापराबाबत मुलांना फारशी माहिती नाही, तेव्हा हे योग्य रीतीने वापरले जाईल का, याबाबत पालकांमध्ये (Parents) चर्चा सुरू झाली आहे.

मेडिकलमध्ये (Medical) सॅनिटायजरचा मुळातच तुटवडा निर्माण झाल्यानं मुलांसाठी सॅनिटायजर (Sanitizer) आणावे कोठून अशी पंचाईतही निर्माण झाली आहे. घरामध्ये दुर्लक्ष झाल्यास लहान मुले साबणासोबतही खेळत बसतात. अशा परिस्थितीत त्यांच्या हातात सॅनिटायजरची बाटली (Sanitizer Bottel) देणं कितपत योग्य आहे. शाळेत शिक्षकांकडून दुर्लक्ष झाल्यास या मुलांकडून याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे.

एका वेळी प्रमाणात सॅनिटायजर घेणे आवश्यक आहे. परंतप, लहान मुलांकडून ते प्रमाणापेक्षा अधिक घेतलं जाईल ही शक्यता नाकारता येत नाही. तसेच सॅनिटायजर लावल्यानंतर दोन ते तीन मिनिटांपर्यंत हात तसंच ठेवावेत. लहान मुलांनी सॅनिटायजर लावल्यावर लगेचच अन्नपदार्थ खाल्ले तर ते पोटात जाऊन त्याचे अन्य परिणाम होऊ शकतात. तसेच वारंवार सॅनिटायजरचा वापर करणेही योग्य नाही. त्वचा नाजूक असल्यास सॅनिटायजरच्या अतिरेकामुळे हातांना भेगा पडणे, त्वचा राठ होणे असेही दुष्परिणाम होऊ शकतात.



हेही वाचा -

कल्याण ते कसारा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

कारवाई सुरू करताच भरला २ कोटींचा कर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा