Advertisement

कल्याण ते कसारा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

टिटवाळ्यातील पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा दरम्यान अप व डाऊन मार्गावर शुक्रवार-शनिवार, शनिवार-रविवार रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात आले आहेत.

कल्याण ते कसारा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक
SHARES

टिटवाळ्यातील पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा दरम्यान अप व डाऊन मार्गावर  शुक्रवार-शनिवार, शनिवार-रविवार रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात आले आहेत. या ब्लाॅकमुळे लोकल ट्रेनसह मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. शनिवारी १४ मार्च रोजी रात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत, तर १४ मार्चच्या रात्री ११.५० ते १५ मार्च रोजी रात्री ३.५० पर्यंत ब्लॉक असेल. यामुळे १४ तारखेला पहाटेची पहिली कसारा लोकल रद्द करण्यात आली आहे.

१३ मार्चला ह्या मेल-एक्स्प्रेस रद्द

 नांदेड ते सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस  १७६११

अमरावती ते सीएसएमटी एक्स्प्रेस १२११२ 

नागपूर ते सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस ११४०२ 

भुसावळ ते सीएसएमटी पॅसेंजर ५११५४ 


१४ मार्चला ह्या मेल-एक्स्प्रेस रद्द

मनमाड ते एलटीटी एक्स्प्रेस १२११८ 

सीएसएमटी ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस १७६१२ 

 सीएसएमटी ते अमरावती एक्स्प्रेस १२१११

सीएसएमटी ते नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस ११४०१ 

 सीएसएमटी ते भुसावळ पॅसेंजर ५११५३

 एलटीटी ते मनमाड एक्स्प्रेस १२११७


१४ मार्चला रद्द लोकल फेऱ्या

 सीएसएमटी ते टिटवाळा- रा. १०.०० वा.

सीएसएमटी ते टिटवाळा- रा. १०.५१ वा.

सीएसएमटी ते टिटवाळा- रा. ११.४४ वा.

टिटवाळा ते सीएसएमटी- रा. ८.२१ वा.

टिटवाळा ते सीएसएमटी- रा. ९.०० वा.

टिटवाळा ते सीएसएमटी- रा. १०.०६ वा.


१४ मार्चच्या पहाटे रद्द लोकल फेऱ्या

कल्याण ते आसनगाव- प. ५.२८ वा.

सीएसएमटी ते कसारा- प. ४.१५ वा.

विद्याविहार ते टिटवाळा- प. ४.५१ वा.

विद्याविहार ते टिटवाळा- प. ५.१२ वा.

टिटवाळा ते सीएसएमटी- प. ४.३२ वा.

टिटवाळा ते सीएसएमटी- प. ५.३५ वा.


हेही वाचा -

कारवाई सुरू करताच भरला २ कोटींचा कर

संतापजनक! नोकरीचे आमीष दाखवून महिलेवर बलात्कार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा