Advertisement

शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्समध्ये ३०८० अंकांची ऐतिहासिक घसरण

कोरोना व्हायरसच्या भितीने गुरूवारी शेअर बाजारात हाहाकार उडाला. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांच सेन्सेक्स तब्बल ३०८० अंकांनी आपटला. तर निफ्टीनेही तब्बल ८०० अंकांची एेतिहासिक लोळण घेतली.

शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्समध्ये ३०८० अंकांची ऐतिहासिक घसरण
SHARES

कोरोना व्हायरसच्या भितीने गुरूवारी शेअर बाजारात हाहाकार उडाला. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांच सेन्सेक्स तब्बल ३०८० अंकांनी आपटला. तर निफ्टीनेही तब्बल ८०० अंकांची एेतिहासिक लोळण घेतली. या प्रचंड मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांची धुळधाण उडाली. गुंतवणूकदारांना ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. 

कोरोना व्हायरसच्या वेगाने प्रसार होत असल्याने त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होत आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्येही यामुळे घसरण चालू आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण चालू आहे. गुरूवारी तर या घसरणीने कळसच गाठला. सेन्सेक्स उघडताना ७७० अंकाने कोसळून उघडला. त्यानंतर घसरण आणखी तीव्र झाली. अखेरीस तर तब्बल ३०८० अंकांपर्यंत सेन्सेक्सची घसरण वाढली. शेअर बाजाराच्या एेतिहासिस सेन्सेक्सने एवढी मोठी कधी आपटी खाल्ली नव्हती. प्रथमच सेन्सेक्स इतक्या विक्रमी अंकाने कोसळला. निफ्टीनेही एेतिहासिक नीचांक नोंदवला. दिवसाअखेरीस सेन्सेक्स २९१९ अंकांच्या मोठ्या घटीने ३२७७८ वर बंद झाला. तर निफ्टीही ८६८ अंकाने कोसळून ९५९० वर बंद झाला. या मोठ्या पडझडीत राष्ट्रीय शेअर बाजारातील ७८३ कंपन्या एक वर्षांच्या नीचांकावर आल्या आहेत. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटन व इतर युरोपियन देशांमधील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली आहे. यामुळे व्यवसाय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.  ट्रम्प यांनी ३० दिवसांसाठी हे निर्बंध लादले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक प्रतिक्रिया उमटली. याशिवाय काही दिवसांपूर्वी आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले आहे. सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. सेन्सेक्सची पडझड होण्यामागे ही सुद्धा प्रमुख कारणे आहेत.



हेही वाचा -

SBI ची खातेदारांसाठी खूशखबर, किमान शिल्लक अट काढली

येस बँकेच्या खातेदारांसाठी खूशखबर, ५ लाख रुपये काढता येणार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा