येस बँकेच्या खातेदारांसाठी खूशखबर, ५ लाख रुपये काढता येणार

निर्बंध घालतानाच बँकेच्या खातेदारांना फक्त ५० हजार रुपये काढण्याची मर्यादाही आरबीआयने ठेवली होती. मात्र, आता बँकेतून अधिक रक्कम काढण्याची खातेदारांना सवलत मिळणार आहे.

येस बँकेच्या खातेदारांसाठी खूशखबर, ५ लाख रुपये काढता येणार
SHARES

रिझर्व्ह बँकेने (reserve bank) येस बँकेवर (yes bank) आर्थिक निर्बंध (financial restrictions) घातले आहेत. हे निर्बंध घालतानाच बँकेच्या खातेदारांना फक्त ५० हजार रुपये काढण्याची मर्यादाही आरबीआयने ठेवली होती. मात्र, आता बँकेतून अधिक रक्कम काढण्याची खातेदारांना सवलत मिळणार आहे. येस बँकेच्या खातेदारांना बँकेतून ५ लाख रुपये काढता येणार आहे. मात्र, एवढे पैसे काढण्यासाठी काही अटी आणि नियमही आरबीआयने घातले आहेत. 

येस बँकेची (yes bank) पत ढासळल्याने रिझर्व्ह बँकेने  (reserve bank) आर्थिक निर्बंधाची कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे संचालक मंडळही बरखास्त केले आहे. आरबीआयच्या निर्बंधानंतर बँकेच्या खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अवघे ५० हजार रुपये खातेदारांना आपल्या खात्यातून काढता येत असल्याने ते हवालदील झाले आहेत. मात्र, आता आरबीआयने खातेदारांना दिलासा दिला आहे. खातेदारांना ५ लाख रुपये काढता येणार आहे. मात्र, खातेधारकांना याबाबत बँकेला पत्र देऊनच पैसे काढण्याची अट घालण्यात आली आहे. वैद्यकीय उपचार, शिक्षण, लग्न आदी कारणांसाठी खातेदार ही रक्कम काढू शकतील.

 खातेधारक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा इलाज सुरु असल्यास, खातेधारकाच्या घरी लग्नसमारंभ असल्यास, खातेधारक मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाणारी फी भरण्यासाठी ५ लाख रुपये काढता येणार आहेत. लग्नासाठी पैसे काढण्यास लग्नपत्रिका, प्रतिज्ञापत्रांसह (affidavit) बँकेत जमा करावी लागेल.हेही वाचा -

एसबीआयचा झटका, ठेवींवरील दर घटवले

कच्चं तेल स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण
संबंधित विषय