Advertisement

एसबीआयचा झटका, ठेवींवरील दर घटवले

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ठेवींवरील (deposite) व्याजदरात (interest rate) कपात करण्याची घोषणा बुधवारी केली. एकाच महिन्यात एसबीआयने दुसऱ्यांदा व्याजदर घटवले आहेत.

एसबीआयचा झटका, ठेवींवरील दर घटवले
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ठेवींवरील (deposite) व्याजदरात (interest rate) कपात करण्याची घोषणा बुधवारी केली. एकाच महिन्यात एसबीआयने दुसऱ्यांदा व्याजदर घटवले आहेत. नवीन दरांनुसार, ७ ते ४५ दिवसांच्या ठेवींवर बँक आता ४ टक्के व्याज देणार आहे. या आधी या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ४.५० टक्के होता. 

नवीन दर १० फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. नवीन मुदत ठेवींना (term deposite) नवीन दर लागू होणार असल्याचं एसबीआयने म्हटलं आहे. बँकेने १ ते ५ वर्ष मुदतीच्या ठेवींवरील दर ६ टक्क्यांवरून ५.९० टक्के केला आहे. तर ५ ते १०  वर्ष मुदतीच्या ठेवींवर ५.९० टक्के व्याज मिळणार आहे. 

ठेवींवरील व्याजदर घटवताना  बँकेने कर्जाच्या व्याजदरात (MCLR) ०.१० टक्के ते ०.१५ टक्क्याची कपात केली आहे. यामुळे बँकेचा कर्जदर ७.७५ टक्के झाला आहे. महिनाभरात बँकेने दुसऱ्यांदा MCLR दर घटवल्याने ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळणार आहे.  कपातीनंतर एक वर्षासाठीचा MCLR आता ७.८५ टक्क्यांवरून ७.७५ टक्के झाला आहे. दोन वर्षांसाठीचा कर्जाचा दर ७.९५ टक्के आहे. याआधी तो ८.०५ टक्के होता. तीन वर्षांसाठी MCLR दर ८.१५ टक्क्यावरून ८.०५ टक्के झाला आहे. तीन महिन्यांसाठी कर्जाचा दर ७.६५ टक्क्यावरून ७.५० टक्के करण्यात आला आहे. नवे व्याजदर येत्या १० मार्चपासून लागू होणार आहेत. 


ठेवींवरील व्याजदर

कालावधीव्याजदर
7 से 45 दिवस4%
46 से 179 दिवस5%
180 से 210 दिवस5.5%
211 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी5.5%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी
5.9%
2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी
5.9%
3 वर्ष ते 4 वर्षांपेक्षा कमी5.9%

5 वर्ष ते  10 वर्षांपेक्षा कमी

5.9%



हेही वाचा -

कच्चं तेल स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण

YES बँकेनं सुरू केली NEFT, IMPS सेवा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा