Advertisement

मुंबई ते न्यूयाॅर्कसाठी एअर इंडियाचे थेट विमान


मुंबई ते न्यूयाॅर्कसाठी एअर इंडियाचे थेट विमान
SHARES

मुंबईवरून न्यूयाॅर्कला अाता थेट जाता येणार अाहे. यासाठी कनेक्टिंग फ्लाईटची गरज भासणार नाही. अाॅक्टोबरपासून मुंबई ते न्यूयाॅर्क अशी थेट विमान सेवा एअर इंडिया सुरू करणार अाहे. याचबरोबर एअर इंडिया फ्रँकफर्टसाठीही पुन्हा विमान सेवा सुरू करणार अाहे. सध्या न्यूयाॅर्क, वाॅशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्कोसाठी एअर इंडियाची विमान सेवा नवी दिल्लीतून अाहे.

अाठवड्यातून ३ वेळा विमान

 एअर इंडिया यंदाच्या हिवाळ्यात अमेरिका अाणि युरोपला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अाणखी चांगली सेवा देण्यासाठी तयारीत अाहे. कंपनी प्रथमच मुंबईतून न्यूयॉर्कसाठी विमान सेवा सुरू करत अाहे.  मुंबई-फ्रँकफर्ट विमान सेवा अाठवड्यातून ४ वेळा अाणि  मुंबई- न्यूयॉर्क विमान सेवा अाठवड्यातून ३ वेळा असणार अाहे. दरम्यान, गो एअरलाही काही दिवसांपूर्वी अापली अांतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली अाहे. 



हेही वाचा - 

१ सप्टेंबरपासून बिल नसल्यास रेल्वे स्टॉल्सवरील पदार्थ मोफत!

मोनोरेल 'एमएमआरडीए'साठी ठरणार पांढरा हत्ती!





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा