१ सप्टेंबरपासून बिल नसल्यास रेल्वे स्टॉल्सवरील पदार्थ मोफत!

गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत जादा दर आकारल्याच्या ७ हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत रेल्वेने हे परिपत्रक जारी केलं आहे. तसंच, स्टॉलवर बिल उपलब्ध झाल्यास जादा दर आकारला जाणार नाही, असा दावाही रेल्वेने केला आहे.

SHARE

येत्या १ सप्टेंबरपासून प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवरून खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर त्याचं बिल मागण्याचा अधिकार असेल. विक्रेत्याने ग्राहकाला खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांचं बिल न दिल्यास ते पदार्थ ग्राहकांना मोफत मिळतील. रेल्वे मंत्रालयाने 'बिल नसल्यास पदार्थ मोफत' ही योजना राबवण्याचं ठरवलं असून त्याअंतर्गत विक्रेत्यांना बिल देण्याची सक्ती करण्यात येणार आहे.


कारण काय?

रेल्वे स्टॉल्सवर किंवा प्रवासादरम्यान रेल्वे गाडीत खाद्यपदार्थांची खरेदी करताना प्रवाशांना निश्चित दरांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. या खाद्यपदार्थांवर जास्त दर आकारण्यात येऊ नये, यासाठी रेल्वे मंत्रालयामार्फत 'बिल नसल्यास पदार्थ मोफत' ही योजना राबवणार आहे.


योजना कशी राबवणार?

या योजनेनुसार प्राथमिक स्वरूपात मध्य रेल्वे मार्गावरील सर्व केटरिंग लायसन्सधारकांना त्यांच्या स्टाॅलवर ३१ ऑगस्टपर्यंत 'बिल नसल्यास खाद्यपदार्थ मोफत' असे स्टिकर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ३१ ऑगस्टपर्यंत सर्व स्टॉलवर ई-बिल मशीन अथवा पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशीन्स बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


७ हजार तक्रारी

गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत जादा दर आकारल्याच्या ७ हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत रेल्वेने हे परिपत्रक जारी केलं आहे. तसंच, स्टॉलवर बिल उपलब्ध झाल्यास जादा दर आकारला जाणार नाही, असा दावाही रेल्वेने केला आहे.

मध्य रेल्वेच्या ३५० स्टॉल्सपैकी २५० स्टॉल्सवर ई-बिलिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील केटरिंगबाबतच्या तक्रारींसाठी पश्चिम रेल्वेने ९००४४९९७३३ हा फोन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. स्टाॅलधारकांनी ग्राहकांना बिल उपलब्ध करून न दिल्यास त्यांच्याविरोधात ग्राहकांना तक्रारदेखील करता येणार आहे. त्यानुसार दोषी स्टाॅलधारकावर कारवाई करण्यात येईल.हेही वाचा-

सर्व रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या; दिवेकरांची मागणी

वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत पाससंबंधित विषय
ताज्या बातम्या