Advertisement

मुंबई लोकलचे आता एसी ट्रेनमध्ये होणार रूपांतर

मंत्रालयानं एसी लोकल गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे.

मुंबई लोकलचे आता एसी ट्रेनमध्ये होणार रूपांतर
SHARES

ताज्या वृत्तानुसार, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील सर्व लोकल ट्रेन आता वातानुकूलित (AC) ट्रेनमध्ये बदलल्या जातील. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC), मध्य आणि पश्चिम रेल्वे दोन्ही अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर रेल्वे बोर्डानं हा निर्णय घेतला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी सर्व पूर्णपणे एसी लोकल ट्रेन मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट्स (MUTP) अंतर्गत खरेदी केल्या जातील. एमआरव्हीसी येत्या काळात २८३ नवीन एसी लोकल ट्रेन खरेदी करणार आहे.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, मंत्रालयानं एसी लोकल गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. पण त्यासाठी वेळापत्रक अद्याप ठरलेलं नाही.

मुंबईत सध्या उपनगरीय नेटवर्कवर चालणाऱ्या नऊ एसी गाड्या आहेत. तथापि, एसी लोकलला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद हा तिकिटाच्या दरामुळे कमी आहे. एसी रेल्वेचे दर हे तर पहिल्या डब्याच्या तिकिटांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे रेल्वे बोर्ड आता रेल्वेच्या सगळ्या गाड्याचे रूपांतर एसी ट्रेनमध्ये करण्याचा विचार करत आहे.

शिवाय, हे समोर आलं आहे की, लोकल ट्रेनचे भाडे कमी होण्याची शक्यता आहे आणि ती महानगरांच्या भाडे रचनेवर आधारित असेल. प्रवाशांनी एसी लोकल ट्रेनचे भाडे कमी करण्याची मागणी केली होती.

मध्य आणि पश्चिम रेल्वेनं अलीकडेच एसी लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचे सर्वेक्षण केले आहे. प्रवाशांकडून रेल्वे मंत्रालयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

याव्यतिरिक्त, रेल्वे मंत्रालयानं सेमी-एसी लोकल ट्रेन चालवण्याची योजना देखील ठेवली आहे. ज्यामध्ये सध्याच्या प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यांव्यतिरिक्त लोकल गाड्यांना एसी कोच जोडण्याचं काम थांबवण्यात आलं आहे, असं वृत्तात समोर आलं आहे.

सेमी एसी लोकल गाड्यांच्या अंमलबजावणीमध्ये बऱ्याच तांत्रिक गोष्टींचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाशी चर्चा झाली आणि प्रकल्प रखडला, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

२५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेवर मुंबईला पहिली उपनगरी एसी लोकल मिळाली. चर्चगेट आणि विरार रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा सुरू आहे.हेही वाचा

महाराष्ट्र बंदचा 'बेस्ट'ला आर्थिक फटका; चाकरमान्यांचेही हाल

१८ ऑक्टोबरपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेनं चालणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा