Advertisement

रेल्वे गाड्या हाऊसफुल, मुंबई-दिल्लीकर कसे जाणार गावी?

दिवाळी आणि छठ पूजा हे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. पण प्रवाशांना कन्फर्म तिकिट नाही मिळत आहे.

रेल्वे गाड्या हाऊसफुल, मुंबई-दिल्लीकर कसे जाणार गावी?
SHARES

रेल्वेकडून कितीही प्रयत्न केला तरी प्रवाशांच्या समस्या काही कमी होत नाहीत. दिवाळी आणि छठ पूजा हे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. पण प्रवाशांना कन्फर्म तिकिट नाही मिळत आहे. 

दिवाळी आधीच दिल्ली, मुंबई, पुणे आणि येसवंतपूरहून गोरखपूरकडे जाणाऱ्या सर्व गाड्या भरल्या आहेत. रेल्वे बोर्डाकडून पूजा विशेष गाड्यांच्या धावण्याची घोषणा सातत्यानं केल्या जात आहेत. पण त्याचा काही फारसा फायदा होताना दिसून येत नाही.

लखनौ आणि प्रयागराज इथून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या भरल्या आहेत. त्यामुळे दीवाळीत घरी जाणाऱ्या प्रवाशांच्या सम्साया वाढल्या आहेत. छठ उत्सवा दरम्यान समस्यांमध्ये अधिक वाढ होईल. पण, रेल्वेनं गोरखपूर-ऐशबाग इंटरसिटी आणि गोरखपूर-पुणे विशेष गाड्या घोषित करून काहीसा दिलासा दिला आहे.

तज्ञांचं म्हणणं आहे की, रेल्वे बोर्डाने मोठ्या विलंबानं विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. बहुतेक लोकांना याची माहिती नसते. तसंच अशा विशेष गाड्यांमध्येही सवलत उपलब्ध नाही आणि भाडेही जास्त आहे. अशा परिस्थितीत लोक फक्त सामान्य विशेष गाड्यांकडे वळत आहेत.

पूजा विशेष ट्रेन ११ नोव्हेंबरला रंगेपाडा उत्तर ते इजतनगर दरम्यान फेरा इथं धावणार आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार ही ट्रेन गोरखपूरमार्गे धावणार आहे. ०५६०५ ही गाडी रंगपाडा उत्तर इथून सकाळी ७ वाजता सुटेल. न्यू जलपाईगुडी, छपरा इथून सुटणारी ही ट्रेन गोरखपूरहून सकाळी १०.०० वाजता सुटेल आणि लखनौमार्गे रात्री ८.३० वाजता इजतनगरला पोहोचेल.



हेही वाचा

राज्यात ७०० कोटींहून अधिक वाहतूक नियम उल्लंघन केलेला दंड थकीत

कोरोनामुळं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपनगरीय स्थानकांतही स्वयंचलित प्रवेशद्वार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा