Advertisement

'वसुली'तही नारीशक्ती! शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आता महिला टीसी

साधारणपणे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये महिला टीसीची नियुक्ती अत्यंत कमी प्रमाणात केली जाते. शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सध्या २ महिला टीसी कार्यरत आहेत. ५ फेब्रुवारी रोजी शताब्दीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर महिला टीसीची ड्युटी लावण्यात आली होती. दंडाची रक्कमही ३० हजारांवरून ५० हजार केल्यानंतर त्याची पूर्ण जबाबदारी महिला टीसीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक आरती परिहार यांनी सांगितलं.

'वसुली'तही नारीशक्ती! शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आता महिला टीसी
SHARES

माटुंगा रेल्वे स्थानकात महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर आता पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्येही महिला तिकीट तपासणीस अर्थात 'टीसी'ची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेने महिला दिनाचं औचित्य साधून ८ मार्चपासून मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्प्रेसमध्ये संपूर्णपणे महिला टीसीचा चमू कार्यरत करण्यात निर्णय घेतला आहे. याप्रकारे पश्चिम रेल्वेवर पहिल्यांदाच एखाद्या एक्स्प्रेसची जबाबदारी महिला टीसीकडे सोपवण्यात आली आहे.

का घेतला निर्णय ?

साधारणपणे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये महिला टीसीची नियुक्ती अत्यंत कमी प्रमाणात केली जाते. शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सध्या २ महिला टीसी कार्यरत आहेत. ५ फेब्रुवारी रोजी शताब्दीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर महिला टीसीची ड्युटी लावण्यात आली होती. दंडाची रक्कमही ३० हजारांवरून ५० हजार केल्यानंतर त्याची पूर्ण जबाबदारी महिला टीसीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक आरती परिहार यांनी सांगितलं.

मुंबईत किती महिला टीसी?

साधारणपणे महिला टीसीची नेमणूक प्लॅटफॉर्मवर केली जाते. म्हणून मेल/एक्स्प्रेसमध्ये महिला टीसी संख्या अत्यल्प आहे. पश्चिम रेल्वेत सुमारे ९० महिला टीसी असून त्यात मुंबईतील महिला टीसीची संख्या ५० आहे.

राजधानीतही होणार नियुक्ती

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्येही महिला टीसीची नियुक्ती करण्याचा विचार करण्यात येत आहे. पण, तिचा प्रवास रात्रीचा असल्याने त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

हेही वाचा-

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद

रेल्वेमंत्र्यांची माटुंगा रेल्वे स्टेशनला भेट, महिला सशक्तीकरणाचं दिलं आश्वासन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा