Advertisement

अंधेरी सब वे बंद असल्याने 'हा' आहे पर्यायी मार्ग

मुंबईत (mumbai) १५ ते २० मिनिटे मुसळधार पाऊस (Heavy rain) झाल्यास अंधेरी सब वे मध्ये एक ते दीड फूट पाणी साचते. या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही.

अंधेरी सब वे बंद असल्याने 'हा' आहे पर्यायी मार्ग
SHARES

पावसाळ्यात (Rain) सखल भागात असलेल्या अंधेरी सब वे (andheri subway) मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं. परिणामी दुर्घटना होण्याची भीती असते. त्यामुळे अंधेरी सब वे आता वाहतुकीसाठी (traffic) बंद ठेवण्यात येणार आहे.  

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे उ्डडाण पूल, मिलन सब वे, गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाचा वापर पर्यायी वाहतूकीसाठी करण्याच्या सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहेत. 

पश्चिम उपनगरचे पोलीस उप आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करुन रात्रीच्या वेळी अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  हा सब वे ३० सप्टेंबरपर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

मुंबईत (mumbai) १५ ते २० मिनिटे मुसळधार पाऊस (Heavy rain) झाल्यास अंधेरी सब वे मध्ये एक ते दीड फूट पाणी साचते. या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. दिवसा वाहनचालकांना येथे साचलेले पाणी दिसू शकते. मात्र रात्री अंधारात अंदाज बांधणे कठीण होऊन जाते. त्यामुळे वाहने पाण्यात अडकून बंद पडतात. रहदारी कमी असल्याने अन्य वाहनचालकांकडून मदत मिळण्याची शक्यताही कमी असते. याठिकाणी जीवित हानी होऊ शकते.  त्यामुळे हा सब वे वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंधेरी सब वे (andheri subway) मध्ये पाणी साचण्याचा वेग लक्षात घेऊन महापालिकेने हा मार्ग पुढील तीन महिन्यांसाठी पूर्ण वेळ बंद ठेवावा, अशी शिफारस वाहतूक पोलिसांना के ली होती. मात्र पूर्व-पश्चिम भाग जोडणारा हा सब वे महत्त्वाचा असल्याने फक्त रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 



हेही वाचा -

लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी; ३० ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणात गोंधळ

मुंबईत २७ जूनपर्यंत निर्बंध; काय सुरू, काय बंद?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा