Advertisement

साध्या लोकललाही स्वयंचलित दरवाजे, पश्चिम रेल्वेचा निर्णय

रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रेल्वे अपघातातून सुटका होण्याती शक्यता आहे.

साध्या लोकललाही स्वयंचलित दरवाजे, पश्चिम रेल्वेचा निर्णय
SHARES

रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रेल्वे अपघातातून सुटका होण्याती शक्यता आहे. कारण एसी लोकलच्या धर्तीवर पश्चिम रेल्वे प्रशासनानं साध्या लोकललाही स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंचलित दरवाजे बसवून १५ डब्यांची विनावातानुकूलित लोकल चालवणं शक्य आहे का, हे तपासण्यासाठी लवकरच लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे.

स्वयंचलित दरवाजे

प्रवाशांच्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजे लोकलला बसविण्याच्या रेल्वे मंडळाच्या सूचना आहेत. ३ डब्यांत एकूण २२ स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. पहिली चाचणी ही रिकाम्या लोकलची होणार आहे. त्यानंतर गर्दीची वेळ वगळून या लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे.

लोकलची चाचणी

स्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकलची चाचणी झाल्यानंतर त्या चाचणीचा अहवाल रेल्वे मंडळात पाठवण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास पश्चिम रेल्वे मार्गावरील साध्या लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. याआधी २०१५ मध्ये साध्या लोकलच्या महिला डब्यात अशी चाचणी घेण्यात आली होती. मात्र, केवळ एका डब्यातील केवळ दोन दरवाज्यांचा यात समावेश करण्यात आला होता.



हेही वाचा -

आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये यंदा अभिनेता रोबो

पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा