SHARE

पश्चिम रेल्वेचं मुख्यालय असलेल्या चर्चगेट स्थानकात प्लास्टिकचा वापर करून बनविण्यात आलेले बाकडे बसविण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेनं प्लॅस्टिकच्या बॉटलच्या रिसायकलिंग करून प्लॅस्टिकपासून बसण्यासाठी बाकडी तयार केली आहेत. 'स्वच्छ भारत अभियान' दिनी पश्चिम रेल्वेनं 'वन टाइम यूज प्लास्टिक'ला तिलांजली देण्यात आली आहे.

टिकाऊ, मजबूत असे  बेंचेस चर्चगेट स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळं वाढत्या प्रदुषणात भर पडणाऱ्या गोष्टी रोखण्यास मदत होणार आहे. प्लॅस्टिकचा वापर केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर मानवी आरोग्यालाही त्रासदायक आहे. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याचं टाळण्यासाठी काही दिवसांपासून विविध स्तरांमधून कार्यक्रम राबवले जात आहे.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वेला ‘सिंगल यूज प्लास्टिक बंद’ करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियान दिनी पश्चिम रेल्वेनं प्लास्टिकच्या बॉटलच्या तुकड्यांचं रिसायकलिंग करून प्लास्टिकपासून बसण्यासाठी बाकडी तयार केले आहेत. हे बाक ‘बॉटल फॉर चेंज’ या प्रकल्पातंर्गत करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मागील काही वर्षांपासून मुंबईत चर्चगेटसह काही पश्चिम मार्गावरील स्टेशनवर प्लॅस्टिक रिसायकल करणारी काही उपकरणं बसवण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना प्लॅस्टिकच्या वस्तू टाकण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याच्याबदल्यात ग्राहकांना काही रिवॉर्ड पॉंईंट्स देखील मिळतात. हेही वाचा -

भाजपची चौथी यादी जाहीर; विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांचा पत्ता कट

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेशसंबंधित विषय
ताज्या बातम्या