आता वांद्रे-चर्चगेट करा गारेगार प्रवास


SHARE

वांद्रे ते दक्षिण मुंबई नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता गारेगार प्रवासाची संधी मिळणार आहे. कारण बेस्टनं वांद्रे वसाहत बसस्थानक ते चर्चगेट या मार्गावर ‘ए-८७’ हा नवीन वातानुकूलित बस सुरू केली आहे. या मार्गावरून सकाळी ७.१५ वाजता पहिली बस धावत आहे. त्यानंतर १५ मिनिटांच्या फरकानं या मार्गावरून आणखी २ बस सुटत असून, शुक्रवारपासून हा मार्ग सुरू झाला आहे.

परतीचा प्रवास

जागतिक व्यापर केंद्र येथून परतीच्या प्रवासासाठी संध्याकाळी ७.४०, ७.५० आणि रात्री ८.०५ वाजता ३ बस सोडण्यात येणार आहेत. मंत्रालय, चर्चगेट, पं. पलुस्कर चौक, वसंतराव नाईक चौक, वरळी, माहीम असा या बसचा मार्ग असणार आहे.

वांद्रे-चर्चगेट फेरीनंतर (सकाळी साडेआठनंतर) या बसगाड्या चर्चगेट येथील अहिल्यादेवी होळकर चौक ते जागतिक व्यापार केंद्र, या मार्गावर वातानुकूलित बसमार्ग ‘ए-२’वर चालवल्या जात आहेत. तसंच या मार्गावर जागतिक व्यापार केंद्र येथून चर्चगेटसाठी सकाळी ८.५० वाजता गाड्या सोडण्यात येत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धारावी आगार वातानुकूलित बसमार्गात बदल करण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून ही सीएसएमटी येथून पी. डिमेलो मार्ग, कर्नाक बंदर, वाडी बंदर, पूर्व मुक्त मार्ग, देवनार आगार, सुमननगर, राणी लक्ष्मीबाई चौक मार्गे चालवली जाईल. धारावी आगारातून या बसगाड्या सीएसएमटी इथं आल्यानंतर सकाळी साडेआठनंतर सीएसएमटी ते एनपीसीए दरम्यान ए-१ या मार्गावर चालविल्या जाणार आहेत.हेही वाचा -

IND Vs BNG: टी-२० सामन्यात बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

भारतीय संघात मुंबईच्या 'या' खेळाडूला संधीसंबंधित विषय
ताज्या बातम्या