Advertisement

किंग्ज सर्कल इथं बेस्टची बस पेटली

मुंबईतील माटुंगा किंग्ज सर्कल परिसरात बेस्टच्या बसला आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास मुलुंड ते वरळी या मार्गावरून जाणाऱ्या बसमधील ड्रायव्हरच्या केबिनला अचानक आग लागली.

किंग्ज सर्कल इथं बेस्टची बस पेटली
SHARES

मुंबईतील माटुंगा किंग्ज सर्कल परिसरात बेस्टच्या बसला आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडलीसंध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास मुलुंड ते वरळी या मार्गावरून जाणाऱ्या बसमधील ड्रायव्हरच्या केबिनला अचानक आग लागली. आग भडकू लागताच प्रवासी तातडीनं बसमधून बाहेर पडल्यानं कोणलाही दुखापत झाली नाही.

शर्थीचे प्रयत्न

बेस्टच्या बसला आग लागल्याची माहिची मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नपूर्वक ही आग विझवली. ही आग नेमकी कशी लागली? यासंदर्भात बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी बस ड्रायव्हरच्या केबिनमधील इलेक्ट्रिक बोर्डला आग लागल्याची माहिती दिली.


प्रवाशांची प्रचंड गर्दी

बेस्टच्या बसला आग लागल्यानं या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली. बघ्यांनी रस्त्यावर मोठी गर्दी केल्यानं परिसरात काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.हेही वाचा -

रोइंगपटू दत्तू भोकनळला दिलासा, कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द

परिवहन विभागाकडून तब्बल ८५० रिक्षा चालकांचे परवाने रद्दRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा