Advertisement

आज ठरणार बेस्टच्या संपाचं भवितव्य


आज ठरणार बेस्टच्या संपाचं भवितव्य
SHARES

आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. मात्र, या संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कामगार संघटनांबरोबर बेस्ट भवनमध्ये सोमवारी चर्चा बोलावली आहे. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये होणाऱ्या बैठकीवर पुढील संपाचं भवितव्य अवलंबून आहे.


कर्मचारी संपावर ठाम

विविध प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप बेस्ट कर्मचाऱ्यांनी केला. यासाठी कामगारांच्या कृती समितीनं घेतलेल्या मतदानात ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाची तयारी दाखविली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उचललं.


गेले अडीच वर्षे कामगारांच्या मागण्यांवर चर्चा सुरू आहे. संप डोक्यावर आल्यानं पुन्हा चर्चेला बोलावत आहेत. मात्र, या वेळेस कामगार ऐकणार नाहीत. सोमवारी होणारी बैठक ही दिखावा आहे. तसंच, संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी बैठक बोलावली असून दर आठवड्याला दोन दिवस बैठक घेतली जाणार आहे. मात्र या बैठका विषय सोडवण्यासाठी नसून फक्त दिशाभूल करण्यासाठी आहेत. त्यामुळं सोमवारी मध्यरात्रीपासून होणारा संप कायम असणार अाहे.

- शशांक राव, सरचिटणीस बेस्ट वर्कस युनियन


मुंबईकरांची होणार गैरसोय

२००७ मध्ये बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ७ हजार ९३० रुपये मास्टर ग्रेडनुसार वेतन श्रेणी लागू करावी, आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला सावरण्यासाठी बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीन करावा, कर्मचाऱ्यांचा २ वर्षांपासून रखडलेला वेतन करार मार्गी लावावा या तीन मुख्य मागण्यांसाठी आणि इतर अनेक मागण्यांसाठी बेस्टच्या कामगार कृती समितीनं ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे.


बैठक फिस्कटली

संपावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी प्रशासनाबरोबर बैठक बोलवली होती. परंतु बैठक फिस्कटल्यामुळं संपाचा निर्णय अंतिम असल्याचं बेस्ट वर्कर्स युनियननं म्हटलं आहे. त्यामुळं बेस्टचे ३० हजार कर्मचारी संपावर जाणार असून सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट धावणार नाही. त्यामुळं मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा -

सोमवारी रात्रीपासून ३० हजार बेस्ट कर्मचारी संपावर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा