बेस्टच्या इलेक्ट्रीक बसला आग

बेस्टच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या इलेक्ट्रीक बसला आग लागल्याची माहिती समोर येत आहे

SHARE

बेस्टच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या इलेक्ट्रीक बसला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड बस डेपो परिसरात बसला आग लागली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली.

इलेक्ट्रीक बसला आग

सोमवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास मुलुंड बस डेपो परिसरात बेस्टच्या इलेक्ट्रीक बसला आग लागल्याचं समजतं. शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचं समजतं आहे. दरम्यान, इलेक्ट्रीक बस ही काही दिवसांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली होती.

जीवितहानी नाही

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आग्निशमन दलाच्या जवानांनी धाव आगीवर नियंत्रण मिळवलं. या इलेक्ट्रिक बसच्या आगीबाबत अग्निशमन दलाचे जवान आणि बेस्ट कर्मचारी अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्टच्या जादा बसाड्या

बेस्टच्या इलेक्ट्रीक बसच्या चार्जिंगसाठी सौर, हरितचा पर्यायसंबंधित विषय
ताज्या बातम्या