Advertisement

बेस्टच्या इलेक्ट्रीक बसच्या चार्जिंगसाठी सौर, हरितचा पर्याय

बेस्टच्या लेक्ट्रीक बसच्या चार्जिंगसाठी विद्युतप्रमाणेच सौर आणि हरित ऊर्जेचा वापर करण्याची मागणी बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केली.

बेस्टच्या इलेक्ट्रीक बसच्या चार्जिंगसाठी सौर, हरितचा पर्याय
SHARES

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमानं घटलेली प्रवासी संख्या भरून काढण्यासाठी बसच्या तिकीट भाड्यात कपात केली. त्यानुसार, साध्या बसचं  किमान भाडं ५ रुपये आणि एसी बसचं भाजं ६ रुपये केलं. तिकीट भाड्यात कपात केल्यानंतर प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेत बेस्टं बसचा ताफा वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बेस्टनं आपल्या ताफ्यात मिनी-मिडी एसी बस आणि इलेक्ट्रीक बस दाखल केल्या. नुकताच बेस्टच्या ताफ्यात इलेक्टीक बस दाखल झाली. परंतु, या बसच्या चार्जिंगसाठी विद्युत ऊर्जेसह सौर, हरित ऊर्जेच्या वापराचा पर्याय स्वीकारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी बेस्ट समितीच्या बैठकीतील मागणीनुसार प्रशासनाकडून त्या अंमलबजावणीचं प्रयत्न केले जाणार आहेत.

पर्यावरणपूरक पर्याय

बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस मागील काही दिवसांपूर्वीच दाखल झाली आहे. या बसला सेवेत आणतानाच चार्जिंगसाठी पर्यावरणपूरक पर्यायांवर बेस्ट समितीच्या सदस्यांची बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी चार्जिंगसाठी विद्युतप्रमाणेच सौर आणि हरित ऊर्जेचा वापर करण्याची मागणी बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी केली. त्यावर बेस्ट समितीची मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी होणार आहे.

पर्याय सुलभ

'इलेक्ट्रिक बस चार्जिंगसाठी विद्युत ऊर्जेचा वापर खर्चिक असताना अन्य पर्यावरणपूरक पर्यायांचा पर्याय सुलभ ठरेल', असा मुद्दा कोकीळ यांनी झालेल्या बैठकीत मांडला. याबाबत त्यांनी प्रशासनास पत्रही पाठविलं आहे. त्यावर बेस्ट आगार, बसस्थानकांत उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग स्टेशनवर सौर, हरित ऊर्जेचा वापर करण्याविषयी प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे.



हेही वाचा -

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ८० जणांना उमेदवारी जाहीर

नवरात्रौत्‍सव निमित्त मुंबई पोलीस सज्ज



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा